(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tsunami Warning : पूर्व तिमोर किनारपट्टीवर शक्तीशाली भूकंपाचे धक्के; हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा
Tsunami Warning : पूर्व तिमोर किनारपट्टीवर शक्तीशाली भूकंपानंतर हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
East Timor : पूर्व तिमोर किनारपट्टीवर शक्तीशाली भूकंपानंतर हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानंतर भारतीय उपमहासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
तिमोर किनारपट्टीवर झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर अजून कोणत्याही जिवित अथवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के मोठ्या क्षमतेचे होते. पूर्व तिमोरच्या जीएमएन टीव्हीचे माहिती संचालक फ्रान्सेझ सुनी यांनी राॅयटर्स वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, भूंकपाचे धक्के शक्तीशाली होते. भूकंपाच्या धक्क्यांनी इमारतीमध्ये हादरे बसू लागल्याने आमचे सहकारी बाहेर पळाल्याचे ते म्हणाले.
या भूकंपाच्या धक्क्यानंतर हिंद महासागर त्सुनामी इशारा आणि शमन प्रणाली (IOTWMS) त्सुनामीचा इशारा दिला आहे. मात्र, युरोपीय-भूमध्य भूकंपविज्ञान केंद्राने (EMSC) त्सुनामीची शक्यता फेटाळली आहे.
इएमएससीने अधिक माहिती देताना सांगितले की, भूकंप 10 किमी खोलवर होता आणि त्याचे धक्के 29 किमी दूर लासपालोसपर्यंत जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता 50 किमी दूर 6.1 रिश्टर स्केल असल्याचे म्हटले आहे.
इंडोनेशियासह पूर्व तिमोर पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर बसले आहे जे सहसा आग्नेय आशिया आणि पॅसिफिक खोऱ्यात पसरलेली तीव्र भूकंपाची क्रिया घडवून आणते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियामध्येही डार्विन शहराच्या 700 किमी दूर भूकंपाचे धक्के जाणवले.
स्थानिकांनी भूकंपाचे फोटोज सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.