Sudan Red Sea port of Suakin : सुदानमधील सुआकिनच्या लाल समुद्रातील बंदरावर 16 हजार मेंढ्यांसह भरलेले जहाज बुडाले,
पशुधन असलेलं जहाज ((Sudan Red Sea port of Suakin) बुडाले तेव्हा ते सुदानमधून सौदी अरेबियाला निर्यात करत होते. बद्र 1 हे जहाज रविवारी पहाटेच्या सुमारास बुडाले ते 15,800 मेंढ्या घेऊन जात होते.
Sudan : सुदानच्या सुआकिनच्या लाल समुद्रातील (Sudan Red Sea port of Suakin) बंदरावर रविवारी हजारो मेंढ्यांसह भरलेले जहाज बुडाले. या दुर्दैवी घटनेत जहाजातील सर्व मेंढ्या बुडाल्या, पण परंतु सुदैवाने जहाजावरील सर्व क्रू मेंबर वाचले आहेत. पशुधन असलेलं जहाज बुडाले तेव्हा ते सुदानमधून सौदी अरेबियाला निर्यात करत होते. सुदानच्या एका वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बद्र 1 हे जहाज रविवारी पहाटेच्या सुमारास बुडाले ते 15,800 मेंढ्या घेऊन जात होते.
अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की जहाजावरील सर्व क्रू मेंबर वाचवण्यात आले आहेत. त्यांनी अपघाताच्या आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बुडालेल्या जहाजाचा बंदराच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. जहाजाने वाहून नेलेल्या मोठ्या संख्येने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने त्याचा पर्यावरणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पशुधनाची एकूण किंमत सुमारे 34 मिलीयन डाॅलर
राष्ट्रीय निर्यातदार संघटनेचे प्रमुख ओमर अल-खलिफा यांनी सांगितले की, जहाजाला बुडण्यासाठी बराच वेळ लागला होता. त्यामुळे काही मेंढ्यांचा जीव वाचवता आला असता. जीव गमावलेल्या पशुधनाची एकूण किंमत सुमारे 34 मिलीयन डाॅलर होती, असे संघटनेच्या पशुधन विभागाचे प्रमुख सालेह सेलीम यांनी सांगितले. ज्यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
ते म्हणाले की, पशुधन मालकांना फक्त 700 मेंढ्या वाचवता आल्या. परंतु, त्या खूप आजारी आढळल्या आहेत आणि जास्त काळ जगण्याची अपेक्षा नाही.
हे बंदर आधीच चौकशीच्या फेऱ्यात
गेल्या महिन्यात मालवाहू क्षेत्रात लागलेल्या मोठ्या आगीचे कारण शोधण्यासाठी हे बंदर आधीच चौकशीच्या फेऱ्यात आहे. सुआकिनचे ऐतिहासिक बंदर शहर आता सुदानचे मुख्य विदेशी व्यापार केंद्र राहिलेलं नाही. ही भूमिका पोर्ट सुदानने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर घेतली आहे.
सुआकिन बंदराचा पुनर्विकास करण्याच्या हालचाली करण्यात आल्या आहेत. परंतु ऐतिहासिक इमारती पुनर्संचयित करण्यासाठी आणि डॉक्सचा विस्तार करण्यासाठी तुर्कीशी 2017 मध्ये केलेला करार दीर्घकाळचे अध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या हकालपट्टीनंतर रद्द करण्यात आला.
सुदान हे दीर्घकालीन आर्थिक संकटाने ग्रासले आहे, जे गेल्या वर्षी लष्करप्रमुख अब्देल फताह अल-बुरहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी बंडानंतर अधिक गडद झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या