(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्यावर गोळीबार; कराचीत बाईकस्वारांकडून हत्या
Terrorist Killed In Karachi: कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्याच्या घरात घुसून दोन अज्ञातांनी त्याची हत्या केली.
Terrorist Killed In Karachi: एअर इंडिया विमान अपहरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कराचीमध्ये ही घटना घडली आहे. दोन अज्ञात बाइकस्वारांनी ही हत्या केली आहे असल्याचे वृत्त आहे. जहून मिस्त्री असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी जहून मिस्त्री यांच्या घरात घुसून दोन अज्ञातांनी ही हत्या केली. मिस्त्रीच्या घराजवळ असलेल्या सीसीटीव्हीत हे हल्लेखोर दिसले आहेत. मात्र, त्यांनी चेहरा लपवला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. विमान अपहरणाचा कट यशस्वी करणाऱ्या पाच पैकी दोनच दहशतवादी सध्या जिवंत आहेत. हे दोघेही पाकिस्तानमध्येच आहेत.
आयएसआयलाही धक्का
जहूर मिस्त्रीच्या हत्येमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयदेखील हैराण झाली आहे. या हत्येमुळे जैश-ए-मोहम्मदच्या गोटात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी या घटनेचे वार्तांकन केले नाही. जिओ न्यूजमध्ये या हत्येचे वृत्त दिले. मात्र, दहशतवाद्याचे नाव बदलले आहे. या घटनेनंतर अनेक चर्चा सुरू आहेत. मागील काही काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. एकीकडे कट्टर धर्मांध दहशतवादी संघटनांकडून हल्ले होत आहेत. तर, दुसरीकडे बलुच फुटीरतावाद्यांकडूनही हल्ले सुरू आहेत.
रूपिन कात्यालला न्याय मिळाला
रूपिन कात्यालच्या कुटुंबाला न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जवळपास 25 वर्षांपूर्वी 25 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडिया विमानाचे काठमांडूमधून अपहरण झाले होते. या विमानात रूपिन कात्याल हे पत्नीसोबत काठमांडू येथे गेले होते. दिल्लीला परतत असताना विमानाचे अपहरण झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी विमानात त्यांची हत्या केली. रूपिन कात्याल यांचं पार्थिव युएई विमानतळावर फेकले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Womens Day 2022 : ITBP च्या महिला जवान सीमा सुरक्षेच्या तैनात, पाहा महिलांच्या शौर्याचा 'हा' खास व्हिडीओ
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतसह भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha