एक्स्प्लोर

Kandahar Hijacking 1999 : ...अन् वाजपेयी सरकारला दहशतवाद्यांसमोर नांगी टाकावी लागली; जाणून घ्या काय आहे कंदहार विमान अपहरण

भारतावर आजपर्यंत जे काही दहशतवादी हल्ले झाले त्यापैकी एक म्हणजे कंदहार विमान अपहरण होय. तब्बल 180 प्रवाशांचे भारतीय विमानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं.

नवी दिल्ली : कंदहार म्हटलं तर अनेकांना आठवतो तो 24 डिसेंबर 1999 चा काळा दिवस. याच दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं आणि त्यातील प्रवाशांना जवळपास आठ दिवस ओलीस ठेवलं. आज या दुदैवी घटनेला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विमानाच्या बदल्यात तत्कालीन वाजपेयी सरकारला दहशतवाद्यांसमोर नांगी टाकावी लागली होती आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं होतं.

नेमकं काय झालं होतं? 
आजपासून 22 वर्षांपूर्वी 24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडूहून इंडियन एअरलाईन्सचं विमानानं IC-814 दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं होतं. त्या विमानामध्ये 180 प्रवासी होते. त्यापैकी 24 प्रवासी हे विदेश होते तर 11 क्रू मेंमर्स होते. उड्डाणानंतर 45 मिनीटांनी, हे विमान भारतीय भूमीत आलं. त्यामध्ये पाच पाकिस्तानी दहशतवादी प्रवास करत होते. त्यांनी या विमानाचं अपहरण केलं आणि ते विमान लाहोरच्या दिशेने निघालं. या विमानातून ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, स्पेन आणि अमेरिका या देशांचे नागरिकही प्रवास करत होते.

आठ दिवस चाललेलं थरारक नाट्य
अपहरणकर्त्यांनी हे विमान कंदहारला नेलं आणि या सर्व प्रवाशांना ओलीस ठेवलं. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या तीन दहशतवाद्यांना भारताने अटक केली होती. या तिन्ही दहशतवाद्यांना सोडावं अशी मागणी या अपहरणकर्त्यांनी केली. या संबंधी दहशतवादी आणि भारत सरकारमध्ये आठ दिवस चर्चा सुरु होती. 

भारताकडे त्या वेळी कोणताही पर्याय नव्हता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या तीन दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जयवंत सिंह स्वतः या तीन कट्टरवाद्यांना कंदहारला घेऊन गेले. या दहशतवाद्यांना सोडल्यानंतर 31 डिसेंबरला विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात आली.

कंदहार विमान अपहरण ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे दहशतवादी कोणत्या थराला जाऊ शकतात आणि भारतीय सुरक्षाव्यवस्था कशी भेदू शकतात याची प्रचिती आली.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?

Embed widget