एक्स्प्लोर
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
वीज संयंत्रातील जनरेटर खराब झाल्याने, लाखो घरातील वीज गेली होती. या घटनेमुळे तैवानच्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला.
तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे. मात्र तिकडे तैवानमध्ये अनेक घरातील लाईट गेल्यामुळे थेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे.
वीज संयंत्रातील जनरेटर खराब झाल्याने, लाखो घरातील वीज गेली होती. या घटनेमुळे तैवानच्या अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला.
तैवानमध्ये सध्या उकाड्याला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत लाईट गेल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं.
वीज गेल्याने शॉपिंग मॉलमध्ये धावपळ उडाली, शिवाय अनेक कार्यालयात अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळालं.
भारतातही यूपीए सरकारच्या काळात विद्युत ग्रीड बिघाडामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात वीज गायब झाली होती. राजधानी दिल्लीसह नऊ राज्यांतील वीजपुरवठा 15 तास खंडित झाला होता.
त्यावेळी तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement