Sri Lanka Crisis : श्रीलंकन आंदोलकांचा पंतप्रधान निवासस्थान आणि नॅशनल टीव्हीवर कब्जा, मोदींकडे मागितली मदत
Sri Lanka Crisis : जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. संतप्त जमावाने पीएम हाऊस आणि राष्ट्रीय टीव्ही 'रूपवाहिनी'च्या स्टुडिओवर कब्जा केला आहे
Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकनवासीयांचा संताप उफाळून आला आहे. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक प्रचंड संख्येने जमा झाले आहेत. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी (Sri Lanka declares state of emergency) जाहीर केली आहे.
संतप्त जमावाने पीएम हाऊस आणि राष्ट्रीय टीव्ही 'रूपवाहिनी'च्या स्टुडिओवर कब्जा केला आहे, तर हजारो लोक संसद भवनाकडे कूच करत आहेत. नॅशनल टीव्हीवर ताबा घेतल्यानंतर वाहिनी बंद झाली. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अहवालानुसार, आतापर्यंत 30 हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान रानिल विक्रनसिंघे यांची देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, आंदोलकांनी या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत गोळीबार केला जात आहे.
देश सोडून पळून गेलेले श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची आपल्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. आंदोलक पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत.
एअरफोसर्न गोटाबायांना विमान दिले
श्रीलंकेच्या हवाई दलाच्या माध्यम संचालकांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (gotabaya rajapaksa) प्रथम महिला आणि दोन अंगरक्षकांना मालदीवमध्ये प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन, सीमाशुल्क आणि इतर कायद्यांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून संपूर्ण परवानगी देण्यात आली होती. 13 जुलै रोजी सकाळी त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करून देण्यात आले.
गोटाबायांचा पहिला प्रयत्न फसला
8 जुलैपासून गोटाबाया कोलंबोमध्ये दिसले नव्हते. ते मंगळवार, 12 जुलै रोजी नौदलाच्या जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बंदरातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी व्हीआयपी सूटमध्ये जाण्यास नकार दिला. राजपक्षे यांनी देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे इतर सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकत नसल्याचा आग्रह धरला, परंतु अधिकार्यांनी ते मान्य केले नाही.
राष्ट्रपतींच्या भावांनाही देशातून पळून जायचे आहे
राष्ट्रपतींचे भाऊ आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे हे देखील देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विमानतळावरील इमिग्रेशन कर्मचार्यांच्या विरोधानंतर त्यांना परतावे लागले. देशात धान्यासाठी जनता तळमळत असताना, बेसिल राजपक्षे यांनी 1 कोटी 13 लाख रुपयांची अमेरिकेला जाण्यासाठी बिझनेस क्लासची चार तिकिटे खरेदी केली होती.
श्रीलंका संकटातील संबंधित मोठे अपडेट्स
- विक्रमसिंघे यांनी सद्यस्थिती हाताळण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे दिली
- गोटाबाया राजपक्षे आज मालदीवमधून सिंगापूरला रवाना होऊ शकतात
- पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे
- श्रीलंकेच्या लष्कराने आपल्या नागरिकांसमोर आपले शस्त्र खाली केले आहे
- आंदोलक संसद भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करत आहेत
इतर महत्वाच्या बातम्या