Sri Lanka Exam cancelled : श्रीलंकेतील अजब परिस्थिती, प्रश्नपत्रिका छापायला पेपर नसल्यानं शालेय परीक्षाच रद्द
श्रीलंकेने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एका अजब कारणामुळे घेतला आहे. देशात कागदांचीच कमतरता निर्माण झाली आहे.
Sri Lanka Exam cancelled : एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशात आता श्रीलंकेत तर प्रश्नपत्रिका छापण्यासाठी कागदच नसल्याने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत. एकीकडे देशात कागद नसताना देशात बाहेरुन कागदपुरवठा आयात करण्यासाठी पैशांची कमतरता असल्याचंही कोलंबोमधील अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितानुसार, येत्या सोमवारपासून एका आठवड्यात नियोजित सर्व चाचणी परीक्षा आणि इतर परीक्ष कागदाचया तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान श्रीलंका 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असल्याचं मागील काही काळापासून दिसत आहे. त्यात आता कागदाचा तुटवडा पडल्याने अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक विद्यार्थ्यांना फटका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ''परीक्षा रद्द करण्याच्या या निर्णयामुळे देशातील 45 लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पदोन्नती दिली जाते की नाही यावर आतापर्यंत झालेल्या परीक्षा आणि इतर शालेय अॅक्टीव्हीटीतून ठरवलं जाणार आहे.
भारताकडून मदतीचा हात
श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे. अशातच आता भारताचे आपल्या शेजारील देशासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. जेणेकरून श्रीलंकेचे सरकार अन्न, औषध आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकेल. श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील नेत्यांनी परस्पर हितसंबंध आणि आर्थिक सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीत अन्न, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यासाठी एसबीआय (SBI ) आणि श्रीलंका सरकार यांच्यात करार करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक
- International Day of Happiness 2022 : जागतिक आनंदी दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्व जाणून घ्या...
- Russia Ukraine War : रशियन सैनिकांकडून वयोवृद्ध महिलांवर अत्याचार नंतर फाशी : युक्रेनच्या खासदाराचा गंभीर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha