एक्स्प्लोर

International Day of Happiness 2022 : जागतिक आनंदी दिन का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्व जाणून घ्या...

International Day of Happiness 2022 : प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी जागतिक आनंदी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आनंदी जीवन आणि आरोग्यसंपन्न राहण्याची प्रेरणा मिळावी.

International Day of Happiness 2022 Date : आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. पण प्रत्येक माणूस आनंदी राहतोच असं नाही. कुणाला आर्थिक त्रास असतो, टेन्शन असतं तर कुणाला कौटुंबिक तणाव असतो तर कुणी आजारांनी त्रस्त असतो. या धावपळीच्या जगात प्रत्येकजण आनंद शोधायची धडपड करत असतो. गडगंज संपत्ती असणारा माणूस देखील अनेकदा खूश नसतो तर कमी पैसा कमवणारा व्यक्तीही आनंदी राहू शकतो, अशी अनेक उदाहरणं आपल्या अवती भवती असतील. 

आनंदी राहता यावं यासाठी अनेकदा लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र त्यानं  ते आनंदी होतीलच असं नाही. मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना आरोग्याप्रति जागरुक करण्यासाठी प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला जातो. 

संयुक्त राष्ट्रानं इंटरनेशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा केली आहे. 2013 सालापासून हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.  2013 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन भूटानची राजधानी थिम्पूमध्ये साजरा केला गेला. त्यानंतर हळूहळू हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला. भूटान सरकारनं तर या दिवशी सरकारी सुट्टी देखील जाहीर केली आहे. जेणेकरुन लोकांनी आपल्या घरच्यांच्या सोबत हा दिवस साजरा करावा. 

वेगवेगळ्या कारणांनी तणावामध्ये वाढ...

कोरोना महामारी असो किंवा व्यक्तिगत आयुष्यातील ताणतणाव असो, कित्येक नागरिक यामुळं त्रासलेले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद हरवला आहे. सोबतच इंटरनेटचा प्रभाव असल्या कारणानं लोकं आभासी दुनियेत अधिक व्यस्त आहेत. यामुळं प्रत्यक्ष नाती जपण्यामध्ये बऱ्याचदा माणूस कमी पडताना दिसत आहे. यामुळं वाद-विवाद, कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढीस लागलं आहे. नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण अशा गोष्टी देखील मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळं आनंददायी जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवत जागतिक आनंददायी दिवस साजरा केला जातो.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
Embed widget