एक्स्प्लोर
आफ्रिदीच्या मुलीच्या मृत्यूची अफवा व्हायरल, काय आहे सत्य?
कराची : पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी टी-20 विश्वचषकापासूनच चर्चेत आहे. स्पर्धेतील पाकिस्तानची खराब कामगिरी आणि भारताचं कौतुक करणाऱ्या वक्तव्यांमुळे शाहिद आफ्रिदीवर प्रचंड टीकाही झाली. पण आफ्रिदी मागील दोन-तीन दिवसात एका दु:खद बातमीमुळे चर्चेत आहे. शाहिदची मुलगी असमाराचा मृत्यू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली आणि गुलाबाच्या पाकळ्या शरीरावर आच्छादलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा फोटो शाहिद आफ्रिदीची मुलगी असमाराचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
https://twitter.com/IrshadShabnum/status/724643542111531008
आफ्रिदीने सुमारे तीन आठवड्यांपूर्वी मुलगी असमारासोबत एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये असमारा रुग्णालयात असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आफ्रिदीने लिहिलं होतं की, 'गेट वेल सून असमारा, आमीन'
हा फोटो व्हायरल झाल्याने असमाराच्या मृत्यूबाबत जोरदार चर्चा रंगली. पण त्यानंतर ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं. आफ्रिदीने सोमवारी संध्याकाळी एक फोटो शेअर केला, ज्यात तो हजमध्ये असल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून असमारा अगदी सुरक्षित असल्याचं कळतं. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच असमारा सुरक्षित असल्याची पोस्टही व्हायरल होत आहे.
I have the most magnificent view from my room A photo posted by Shahid Afridi (@safridiofficial) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement