एक्स्प्लोर
तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान
सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये पाहायला मिळतो. उंच इमारती किंवा रेल्वे रुळांवर काढलेले जीवघेणे सेल्फी याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत. लॉस अँजेलसमध्ये अशाच एका तरुणीचा सेल्फीमोह कलाकाराला महागात पडला आहे.
लॉस अँजेलस : सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांमध्ये पाहायला मिळतो. उंच इमारती किंवा रेल्वे रुळांवर काढलेले जीवघेणे सेल्फी याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत. लॉस अँजेलसमध्ये अशाच एका तरुणीचा सेल्फीमोह कलाकाराला महागात पडला आहे.
लॉस अँजेलसमध्ये आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात विविध कलाकारांनी आपल्या कलाकृती मांडून ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एका कलाकृतीसोबत फोटो काढण्याचा मोह प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एका तरुणीला झाला. सेल्फी काढण्यासाठी ती गुडघ्यावर बसली, मात्र तिचा धक्का लागला आणि कलारचना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पडली.
संबंधित कलाकृती पडल्यामुळे कलाकाराचं 2 लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 1 कोटी 32 लाख 66 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे तब्बल 30 तास खर्च करुन उभारलेली कलाकृती क्षणार्धात कोलमडली.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement