Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Sayyed Hassan Nasrallah : नसराल्लाह शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला. इस्रायली सैन्याने राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 80 टन वजनाच्या बॉम्बने हल्ला केला.
Sayyed Hassan Nasrallah : इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह (Sayyed Hassan Nasrallah Assassination) याचा मृतदेह सापडला आहे. वैद्यकीय आणि सुरक्षा पथकांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून नसराल्लाहचा मृतदेह बाहेर काढला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नसराल्लाह यांच्या शरीरावर हल्ल्याच्या थेट खुणा नाहीत. त्यांच्या मृत्यूमागे मोठा स्फोट झाल्यामुळे झालेला आघात असल्याचे मानले जात आहे. नसराल्लाह शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला. इस्रायली सैन्याने राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 80 टन वजनाच्या बॉम्बने हल्ला केला. हल्ल्याच्या 20 तासांनंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हिजबुल्लाहने नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी केली.
नसराल्लाहच्या मृत्यूनंतरही लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच
रविवारी इस्रायलने लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले. अल जझीरा वृत्तवाहिनीने त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. नसराल्लाहवर झालेल्या हल्ल्याची (Sayyed Hassan Nasrallah Assassination) माहिती होती, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या कारवाईसाठी लढाऊ विमानांनी उड्डाण केल्यानंतर इस्रायलने त्याला माहिती दिली होती. मात्र, ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी अमेरिकेला संदेश पाठवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दुसरीकडे, नसराल्लाहच्या मृत्यूनंतरही इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवले.
टाककेले बाॅम्ब भूगर्भात घुसून स्फोट घडवून आणण्यास सक्षम
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला, तर 195 जण जखमी झाले. NYT ने आपल्या अहवालात दावा केला आहे की, इस्रायलने नसराल्लाला मारण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी 8 लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या मुख्यालयावर 2 हजार पौंडचे 15 बॉम्ब टाकण्यात आले. अहवालानुसार, हे अमेरिकन बनावटीचे BLU-109 बॉम्ब होते, ज्यांना बंकर बस्टर देखील म्हणतात. हे ठिकाणाहून भूगर्भात घुसून स्फोट घडवून आणण्यास सक्षम आहेत.
हसन नसराल्लाह यांचा स्फोटामुळे मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्ला प्रमुख हसनचा मृतदेह सापडला आहे. वैद्यकीय आणि सुरक्षा पथकांनी हल्ल्याच्या ठिकाणाहून मृतदेह बाहेर काढला आहे. रॉयटर्सने सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, हसनच्या शरीरावर हल्ल्याच्या थेट खुणा नाहीत. मोठा स्फोट झाल्याने झालेल्या आघातामुळे त्यांच्या मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या