एक्स्प्लोर

Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड, दोन मुलं अन् रशियातील आलिशान महालाची जगभरात रंगली चर्चा

काबाएवा आणि पुतिन यांनी 2008 मध्ये डेट करायला सुरुवात केली. 6 वर्षानंतर पुतिन यांनी पत्नीला घटस्फोट दिला. काबाएवाने स्वित्झर्लंडमधील प्रसूती केंद्रात आणि मॉस्कोमधील व्लादिमीरमध्ये इव्हानला जन्म दिला.

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना त्यांची मैत्रीण एलेना काबाएवासोबत दोन मुलं असल्याचे समोर आलं आहे.फोर्ब्सने आपल्या अहवालात दोन्ही मुलांचे वय पाच आणि 9 वर्षे असल्याचा दावा केला आहे. इव्हान आणि व्लादिमीर जूनियर अशी त्यांची नावे आहेत. मॉस्कोमधील पुतीन यांच्या बंगल्यात ते कडेकोट सुरक्षेखाली राहतात. ते त्यांच्या पालकांना क्वचितच भेटतात. फोर्ब्सने रशियाच्या एका तपास संस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, काबाएवा आणि पुतिन यांनी 2008 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. 6 वर्षानंतर पुतिन यांनी पत्नीला घटस्फोट दिला. काबाएवाने स्वित्झर्लंडमधील प्रसूती केंद्रात आणि मॉस्कोमधील व्लादिमीरमध्ये इव्हानला जन्म दिला.

दोन्ही मुलांचा त्यांच्या वयाच्या इतर मुलांशी संपर्क होत नाही. ते घरीच संगीत, पोहणे आणि जिम्नॅस्टिक शिकतात. यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. इव्हानने जिम्नॅस्टिकशी संबंधित अनेक स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. याशिवाय त्याने वडील पुतिन यांच्यासोबत अनेकदा हॉकीचे सामनेही खेळले आहेत.

पुतिन यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली 

पुतिन यांनी अधिकृतपणे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून फक्त त्यांच्या दोन मुलींचीच माहिती दिली आहे. मारिया आणि कतरिना अशी त्यांची नावे आहेत. पुतीनची मैत्रीण एलेना ही एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. तिनं आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. मात्र, पुतिन यांनी हे कधीही जाहीरपणे सांगितले नाही. पुतिन आणि तिच्या मुलांसोबत एलेनाच्या जवळीकीच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये येतात.

पुतिन यांनी आपल्या मैत्रिणीसाठी राजवाडा बांधला

मागील वर्षाच्या सुरुवातीला, द प्रोजेक्ट या रशियन तपास न्यूज वेबसाइटने दावा केला होता की पुतिन यांनी त्यांची गुप्त मैत्रीण एलेना काबाएवासाठी एक आलिशान राजवाडा बांधला होता. हा राजवाडा सोन्याचा असून मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वालदाई तलावावरील जंगलात आहे. पुतीन यांचे येथे अनेक मोठे वाडे आहेत. अहवालानुसार, सुमारे 990 कोटी रुपये खर्चून 13 हजार स्क्वेअर फूटमध्ये व्हिलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पुतिन यांच्या खास राजवाड्यापासून ते फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यात लाकडाचे काम करण्यात आले असून माणिक जडित झुंबर टांगण्यात आले आहे. येथे खेळाचे मोठे मैदानही आहे.

एलिनाजवळील ब्लॅक-सी कोस्टवरील सर्वात मोठे अपार्टमेंट

अलिना यांना 2014 मध्ये कोवलचॅकच्या कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपची प्रमुख बनवण्यात आली होती. यामुळे त्यांना 86 लाख पौंड वार्षिक उत्पन्न मिळते. त्याच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ब्लॅक-सीकडे सोचीमध्ये एक पेंटहाऊस आहे, जो रशियामधील सर्वात मोठा अपार्टमेंट आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Mahamandal : राष्ट्रवादीचा गेम? अजित पवारांच्या पक्षाला एकही महामंडळ नाही? ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांच्यासाठी नाना पाटेकर स्वतः घेऊन आले जेवणाचं ताट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
Embed widget