Starliner spacecraft Back on Earth : सुनीता विल्यम्स अंतराळामध्येच अडकल्या, स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग; सुनीतांची घरवापसी केव्हा होणार?
बोइंग कंपनीने हे अंतराळयान नासासाठी बनवले आहे. 5 जून रोजी सुनीता आणि बुच यांना ISS मध्ये पाठवण्यात आले. हे केवळ 8 दिवसांचे मिशन होते, परंतु त्याच्या सुरक्षित परतण्याबद्दल अनेक शंका होत्या.
Starliner spacecraft Back on Earth : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. नासाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून (ISS) वेगळे झाले होते. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 6 तास लागले. स्टारलाइनरने सकाळी सव्वा नऊ वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. तेव्हा त्याचा वेग ताशी 2735 किमी इतका होता. हे सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड स्पेस हार्बर (वाळवंट) येथे उतरले.
Astronauts Suni Williams and Butch Wilmore are set to return to Earth next February as part of NASA's @SpaceX #Crew9 mission. Get the details: https://t.co/vHT5rrOs3M pic.twitter.com/XAEKzYoy3h
— NASA (@NASA) September 7, 2024
बोइंग कंपनीने हे अंतराळयान नासासाठी बनवले आहे. 5 जून रोजी सुनीता आणि बुच यांना ISS मध्ये पाठवण्यात आले. हे केवळ 8 दिवसांचे मिशन होते, परंतु त्याच्या सुरक्षित परतण्याबद्दल अनेक शंका होत्या. त्यामुळे नासाने अंतराळवीरांना बोइंगऐवजी स्पेसएक्स यानाने आणण्याचा निर्णय घेतला. सध्या बोईंगची स्टारलाइन क्रूशिवाय पृथ्वीवर सुखरूप परतली आहे.
नासा आणि बोईंग यांच्यात वाद
सीएनएनच्या वृत्तानुसार, स्टारलाइनरच्या वापसी आणि त्याच्याशी संबंधित अपडेट्सबाबत NASA ने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात बोईंगचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. 24 ऑगस्ट रोजी नासाने सुनीता विल्यम्स यांच्या परतीसाठी बोइंगचे स्पेसक्राफ्ट स्टारलाइनर असुरक्षित घोषित केले होते. तेव्हापासून, बोईंगच्या कोणत्याही अधिकाऱ्याने स्टारलाइनरशी संबंधित कोणत्याही पत्रकार परिषदेला हजेरी लावली नाही. नासाचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले की, स्टारलाइनरने चांगले लँडिंग केले. आम्ही ते तपासासाठी पाठवले आहे. अंतराळयानामध्ये बिघाड कशामुळे झाला हे आम्ही लवकरच सांगू. नासा आणि बोईंग यांच्यात समस्या असल्या तरी दोघेही संयुक्तपणे स्टारलाइनरची चौकशी करतील. जेणेकरून स्टारलाइनच्या प्रोपल्शन सिस्टममध्ये बिघाड का झाला हे शोधता येईल.
नासाचे माजी अंतराळवीर म्हणाले, योग्य निर्णय
नासाचे माजी अंतराळवीर गॅरेट रेझमन यांनी सीएनएनला सांगितले की, रिकामे अंतराळ यान आणण्याचा नासाचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. Reisman सध्या एलोन मस्कच्या SpaceX शी संबंधित आहेत. ते म्हणाले की स्टारलाइनर सुरक्षितपणे उतरले असले तरी त्याच्या सुरक्षित लँडिंगबद्दल कोणालाही खात्री नव्हती. स्पेस स्टेशनवर उपस्थित सुनीता विल्यम्स यांनी स्टारलाइनरच्या सुरक्षित लँडिंगनंतर आनंद व्यक्त केला. टीमचे कौतुक करताना त्या म्हणाले की, तुम्ही लोक उत्कृष्ट आहात. त्याचवेळी, बोईंगची लँडिंग कमांडर लॉरेन ब्रेंकी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, स्टारलाइनर सुखरूप घरी आलं आहे. किती नेत्रदीपक लँडिंग केले.
सुनीतांची घरवापसी फेब्रुवारी 2025 मध्ये होईल
अंतराळवीर सुनीता विल्यम्स दोन महिन्यांहून अधिक काळानंतरही अवकाशात आहेत. आता त्यांची घरवापसी फेब्रुवारी 2025 मध्ये होईल. या काळात त्यांनी अंतराळात सुमारे 250 दिवस घालवले असतील. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरात, डोळे आणि डीएनएमध्ये अनेक बदल दिसून येतील.
इतर महत्वाच्या बातम्या