
Ukraine Russia War : युक्रेनचा पलटवार, रशियाच्या हद्दीत घुसून केला पहिला हल्ला
Ukraine Russia War : युक्रेनने रशियावर पलटवार केला आहे. रशियाकडून सतत हल्ले सुरू असातना आता युक्रेनने रशियाच्या हद्दीत घुसून पहिला हल्ला केला आहे.

Ukraine Russia War : गेल्या 36 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशातील हा संघर्ष आता शिलेगाल पोहोचला आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले होत आहेत. परंतु, आता रशियाच्या हद्दीत घुसून युक्रेनने पहिला हल्ला केला आहे.
रशिया हद्दीतील बेलगोरोडच्या इंधन डेपोमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. बेल्गोरोडच्या राज्यापालंच्या म्हणण्यानुसार, युक्रेनकडून हेलिकॉप्टरच्च्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यामुळे इंधन डेपोला आग लागली. युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टरने या इंधन डेपोवर हल्ला केला. या हल्ल्यात आगारात काम करणारे दोन कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे.युक्रेनकडून रशियाच्या हद्दीत केलेला हा पहिला हल्ला असल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे.
युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कमी उंचीवरून अनेक क्षेपणास्त्रे डागली जात असल्याचे दिसत आहे. क्षेपणास्त्रे टाकल्यानंतर स्फोट होऊन इंधन डेपोला आग लागली. या हल्ल्याबाबत बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 35 किलोमीटर असलेल्या बेल्गोरोडमधील झालेल्या हल्ल्यामुळे शांतता चर्चा सुरू ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहिली नाही.
रशिया आणि युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे.या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या युद्धाचा परिमाण होत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 153 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर 245 हून अधिक मुले जखमी झाली आहेत. रशियाचेही मोठे नुकसान केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून 17,700 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाची आतापर्यंत 143 विमाने, 131 हेलिकॉप्टर, 625 टँक आणि 24 विशेष उपकरणे नष्ट केल्याचा दावा युक्रेन केला आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनध्ये शांततेसाठी चर्चा सुरू आहेत."युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चेची नवीन फेरी सुरू झाली असून याअंतर्गत ऑनलाइन माध्यमातून बैठक घेण्यात येत आहे, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखाईल पोडोलियाक यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
India Russia : LAC वर चीनने आगळीक केल्यास रशियाकडून भारताला मदत नाही; अमेरिकेचा दावा
Russia Ukraine War : रशियाचा मारियुपोलमध्ये युद्धविराम जाहीर, 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
