(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : खारकिव्हजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यात 21 ठार, मॉस्कोने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारला
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील 23 दिवसांच्या युद्धानंतरही रशियाची आक्रमक भूमिका कायम आहे. रशियन सैन्याने गुरुवारी खारकिव्हजवळ केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 23 व्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याच्या चर्चेला अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, रशियाची आक्रमक भूमिका कायम आहे. 23 तारखेलाही रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले. रशियन सैनिकांनी खारकिव्हजवळ हवाई हल्लाही (Airstrike) केला. हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर रशियाने युद्ध थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळत युक्रेनवरील हल्ला सुरुच ठेवला आहे.
अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले
मिळालेल्या अहवालानुसार, रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. येथील एका चित्रपटगृहावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या थिएटरमध्ये सुमारे 1000 लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात 21 जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
हल्ला थांबवण्यास रशियाचा नकार
दरम्यान, रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला. गुरुवारी रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी एक आदेश देत रशियाला युक्रेनवरील हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले होते.
युक्रेनमधील इतर शहरांमध्येही बॉम्बस्फोट
रशियन सैन्याने 22 व्या दिवशीही युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब हल्ला केला. युक्रेनची राजधानी कीव्हमधील अनेक इमारतींवरही बॉम्बफेक करण्यात आली. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine War : देशासाठी आधी हातात रॅकेट घेतलं, बलाढ्य फेडररला हरवलं, आता रशियाला हरवण्यासाठी रायफल हाती!
- व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला!
- Russia Ukraine : रशियासोबतचे युद्ध संपेना; युक्रेनला अमेरिकेकडून मोठी लष्करी मदत जाहीर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha