एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रस्त्यावर मृतदेह, अन्नाच्या शोधात भटकणारे लोक; रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंसाचं दृश्य

Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. युक्रेनमधील मारियुपोलमध्ये रशियन हल्ल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांवरून विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. युक्रेनमधील मारियुपोलमध्ये रशियन हल्ल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांवरून विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. अनेक दिवसांपासून उपाशी असलेले लोक आता अन्नाच्या शोधात दुकानांचे कुलूप तोडून खाद्यपदार्थ चोरत आहेत तर, तहान भागवण्यासाठी बर्फ वितळवून घेत आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या आवाजाने शहर हादरले असून हजारो लोकांनी जीव वाचवण्यासाठी तळघरात आश्रय घेतला.

मारियुपोल शहराची लोकसंख्या सुमारे 4 लाख 30 हजार आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. मंगळवारीही येथे अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला नाही. सुरक्षित कॉरिडॉरद्वारे लोकांना बाहेर काढण्याचे आणि अन्न, पाणी आणि औषध पुरवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने काफिला शहरात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर गोळीबार केला.

एका वृत्तसंस्थेनुसार, तळघरात तेलाच्या दिव्याच्या उजेडात महिला आणि मुलांमध्ये रडत असताना गोमा जाना युक्रेनमधील परिस्थितीबद्दल म्हणाल्या की, 'मला माझे घर परत हवे आहे, मला माझी नोकरी परत हवी आहे. मी माझे लोक आणि माझ्या शहरातीलबद्दल दुःखी आहे.'

रशियाने युक्रेनवर हल्ला करून जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. अझोव्ह समुद्रावर वसलेले मारियुपोल अनेक दिवसांपासून रशियन सैन्याने वेढले आहे. युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेशचुक यांनी सांगितले की मारियुपोल विनाशकारी परिस्थितीत आहे.

दरम्यान, युक्रेनच्या लष्कराला मदत करण्यासाठी पोलंडने अमेरिकेला आपली सर्व मिग-29 लढाऊ विमाने दिली आहेत. यूएस संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की या प्रस्तावामुळे नाटो (NATO) साठी गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी युक्रेन सोडले आहे. रशियाला आर्थिक स्तरावर वेगळे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन तेल आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आणि बहुराष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी शेल यापुढे रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणार नाही असे सांगितले.

दरम्यान, मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स, कोका-कोला, पेप्सिको आणि अनेक टेक कंपन्या तसेच जागतिक ब्रँड्सनी युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रशियामधील त्यांचा व्यवसाय तात्पुरता स्थगित केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
Gen-Z Populations : Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर
Gen-Z लोकसंख्येमध्ये शेजारच्या चीन अन् पाकिस्तानमध्ये कुणाची आघाडी? पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीची रंजक माहिती, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget