(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी
Russia Ukraine War : युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले. त्याच वेळी, रशियन सैन्याने युक्रेनियन नॅशनल गार्डचे मुख्यालय नष्ट केले.
Russia Ukraine War : युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, लुहान्स्क भागात पाच रशियन विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले. दरम्यान, युक्रेनच्या सीमा संरक्षण एजन्सीने सांगितले की, रशियाच्या सैन्याने शेजारील बेलारूसमधून देशावर हल्ला केला. कीव, खार्किव, ओडेसा आणि युक्रेनच्या इतर शहरांमध्ये मोठा आवाज ऐकू आला. दरम्यान, रशियन सैन्याने दावा केला आहे की त्यांनी युक्रेनियन नॅशनल गार्डचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे.
Said to be a massive line of cars leaving Kyiv, the Ukrainian capital. https://t.co/SPjh5pBiDK
— Christopher Miller (@ChristopherJM) February 24, 2022
रशियाने केलेला हल्ला अन्यायकारक : बायडन
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीने निवेदन जाहीर केले. रशियाने केलेला हल्ला हा विनाकारण आणि अन्यायकारक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले. अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बायडन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बायडन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्याची दूरध्वनीवरून चर्चा केली.
युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. दरम्यान भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडीकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
- Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
- Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताचं संयुक्त राष्ट्रात शांततेचं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha