एक्स्प्लोर

Russia Ukraine Crisis LIVE : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग; अमेरिका रशियावर निर्बंध लावणार, पाहा प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Russia Ukraine Crisis LIVE Updates : पूर्व युक्रेनमधल्या दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता. अमेरिका, फ्रान्स, जर्मनसह अनेक राष्ट्रांची तीव्र नाराजी.

LIVE

Key Events
Russia Ukraine Crisis LIVE :  रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग; अमेरिका रशियावर निर्बंध लावणार, पाहा प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Background

Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटले...

Russia Ukriane Conflict in UNSC : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभराची चिंता वाढली आहे.  रशियानं आक्रमक पवित्रा घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहेत. या प्रांतांनाच स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देणाऱ्या करारावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढंच नव्हे तर आता रशियानं या दोन्ही प्रांतात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) तातडीची बैठक बोलावली.  या बैठकीत रशियाने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिली. अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा निषेध केला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी घेतलेला निर्णय हा युक्रेनचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले. 

भारताची भूमिका काय?

या बैठकीत भारतानेही आपली भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले की, युक्रेनच्या सीमेवर वाढणारा तणाव हा गंभीर विषय आहे. सध्या घडत असलेल्या घटनांमुळे या भागातील शांतता आणि सुरक्षितेला कमकुवत करू शकतात. वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. युक्रेनमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, डॉक्टर युक्रेनच्या विविध भागात वास्तव्यास आहेत. या भारतीयांची सुरक्षिता ही आमची प्राथमिकता असल्याचेही टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले. 

Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?

Russia Ukraine Tension : अमेरिका आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा परिणाम (Russia Ukraine Crisis) संपूर्ण युरोपमध्ये दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये जेव्हा वॉशिंग्टननं युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याच्या असामान्य हालचालींचा अहवाल दिला होता, तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली होती.

रशिया फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं मत अमेरिकेकडून व्यक्त केलं जात होतं. त्यांचा दावा आहे की, सुमारे 1 लाख रशियन सैन्य गेल्या आठवड्यापासून युक्रेनच्या सीमेजवळ तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशिया थंड वातावरण पाहता युक्रेनभोवतीचा बर्फ वितळण्याची वाट पाहत आहे. 

दरम्यान, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना पूर्व युक्रेनपासून विभक्त झालेल्या डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या दोन शहरांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाला संबोधित करताना युक्रेनला अमेरिकेची वसाहत असल्याचं सांगितलं आणि युक्रेनचा कारभार हा अमेरिकेवर अवलंबून असल्याचं म्हटलं. 

12:21 PM (IST)  •  22 Feb 2022

जपानकडून रशियाचा निषेध; निर्बंधांसह संभाव्य 'गंभीर कारवाई'चा विचार करण्याचा इशारा

Russia Ukraine Conflict : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे कथित उल्लंघन केल्याबद्दल रशियाचा निषेध केला आहे. जपान रशियावर निर्बंधांसह इतरही कारवाई करण्याचा विचार करू शकतो असा इशारा दिला आहे. 

11:58 AM (IST)  •  22 Feb 2022

युक्रेनमध्ये एअर इंडियाचे विमान दाखल, भारतीयांना मायदेशी आणणार 

युक्रेनमधील भारतीय नागरीक, विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने विशेष विमान सेवा सुरू केली आहे. या विशेष मोहिमेतील पहिले विमान मंगळवारी युक्रेनमध्ये दाखल झाले. याआधी कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना मायदेशी परतण्याची सूचना केली होती.

11:52 AM (IST)  •  22 Feb 2022

: Russia Ukraine Crisis LIVE : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग; अमेरिका रशियावर निर्बंध लावणार, पाहा प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. या धोक्यांमुळे भारत युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची योजना तयार करत आहे. 

10:20 AM (IST)  •  22 Feb 2022

अमेरिका रशियावर निर्बंध लावणार; व्हाइट हाऊसची माहिती

USA on Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केल्यानंतर अमेरिकेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. अमेरिका रशियावर मंगळवारपासून नवीन निर्बंध लागू करणार असल्याची माहिती व्हाइट हाऊसने दिली. या निर्बंधांबाबत इतर देशांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी दिली. 

09:26 AM (IST)  •  22 Feb 2022

Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटले...

Russia Ukriane Conflict in UNSC : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभराची चिंता वाढली आहे.  रशियानं आक्रमक पवित्रा घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहेत. या प्रांतांनाच स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देणाऱ्या करारावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढंच नव्हे तर आता रशियानं या दोन्ही प्रांतात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) तातडीची बैठक बोलावली.  या बैठकीत रशियाने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिली. अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा निषेध केला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी घेतलेला निर्णय हा युक्रेनचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget