एक्स्प्लोर
आधी आईवरुन शिवी, नंतर ओबामांची माफी!
मलीना : जगातील सर्वात शक्तिशाली देश अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शिवी दिल्यानतर फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी माफी मागितली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, रॉड्रिगो यांनी त्यांच्या विधानावर खेद व्यक्त केला आहे.
https://twitter.com/ANI_news/status/773015229286449152
मानवाधिकाराचं उल्लंघनाच्या मुद्द्यावरुन रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांना आईवरुन शिवी दिली होती. यानंतर ओबामांनी रॉड्रिगो डुटर्टे यांच्यासोबतची लाओसमध्ये आज होणारी प्रस्तावित भेट रद्द केली होती.
काय आहे प्रकरण?
रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामा यांना आईवरुन शिवी दिली. फक्त शिवीच नाही तर डुटर्टे यांनी ओबामांना खुलेआम धमकीही दिली. "ओबामा स्वत:ला काय समजतात. मी एका स्वतंत्र देशाचा राष्ट्रपती आहे. माझी मालक केवळ फिलिपिन्सची जनता आहे. आम्हाला एकमेकांचा आदर करायला हवा. मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नसून जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे," असं विधानही त्यांनी केलं.
फिलिपिन्सच्या अध्यक्षांची ओबामांना शिवी, भेट रद्द
मानवाधिकाराच्या मुद्द्यावरु शिवी मानवाधिकाराचं उल्लंघनाच्या मुद्द्यावरुन डुटर्टे यांनी शिवीगाळ केली. डुटर्टे यांनी याआधी फिलिपिन्समधील अमेरिकेचे राजदूत फिलिफ गोल्डबर्ग यांना गे म्हणून संबोधलं होतं ड्रग तस्करांना मृत्यूदंड रॉड्रिगो डुटर्टे 30 जून रोजी फिलिपिन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. सत्तेवर येताच त्यांनी एक लाख ड्रग्ज तस्करांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड देणार असल्याची घोषणा केली. हे वचन पूर्ण करण्यासाठी डुटर्टे यांनी आतापर्यंत 2400 जणांना मृत्यूदंड दिला आहे. रॉड्रिगो डुटर्टे यांच्या आदेशावर 2400 लोकांच्या हत्येनंतर जगभरात गदारोळ झाला आहे. मानवाधिकाराचं उल्लंघन केल्याने फिलिफिन्स अमेरिकेसह अनेक राष्ट्रांच्या निशाण्यावर आहे. जी-20 परिषदेतही रॉड्रिगो डुटर्टे यांनी ड्रग तस्करांविरोधातील लढाई सुरु ठेवण्याचा पुनरुच्चार केला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement