Pakistan : पाकिस्तानमध्ये एकीकडे राजकीय संकट तर दुसरीकडे 'शाहीन 3' मिसाईल चाचणी
पाकिस्तानने आज 'शाहीन 3' या मिसाईलची चाचणी केली आहे. हे मिसाईल इंधन आणि पोस्ट सेपरेशन अल्टीट्यूट करेक्शन प्रणाली विरहित आहे.
लाहोर: एकीकडे पाकिस्तानमध्ये राजकीय संकट आलं असताना, इम्रान खान सरकार धोक्यात आलं असताना दुसरीकडे मात्र जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे मध्यम पल्ल्यांच्या 'शाहीन 3' या मिसाईलची चाचणी घेण्यात आली आहे. हे मिसाईल 2,750 किमीपर्यंतचे लक्ष्य भेद करु शकते. तसेच हे मिसाईल इंधन आणि पोस्ट सेपरेशन अल्टीट्यूट करेक्शन प्रणाली विरहित आहे.
पाकिस्तान लष्कराचे यूनिट असलेल्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, वेगवेगळे डिजाईन आणि टक्नॉलॉजीच्या मानकांचे अद्ययावत करणे हा या मिसाईलच्या परीक्षणाचा उद्देश होता.
Pakistan today conducted successful flight test of Shaheen-III surface to surface ballistic missile. The test flight was aimed at revalidating various design and technical parameters of the weapon system. pic.twitter.com/WHmjPGZobZ
— DG ISPR (@OfficialDGISPR) April 9, 2022
मारक क्षमता 2,750 किमी
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शाहीन या मिसाईलची मारक क्षमता 2,750 किमी इतकी आहे. ते एक मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे. या मिसाईलचे 2015 साली पहिल्यांदा परीक्षण करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीच पाकिस्तानने बाबर क्रूझ या स्वदेशी मिसाईलच्या उन्नत रेंज या मॉडेलचे परीक्षण केलं होतं.
या मिसाईलच्या यशस्वी परीक्षणानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये एकीकडे राजकीय संकट असताना दुसरीकडे मिसाईल टेस्ट केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: