एक्स्प्लोर
Advertisement
दहशतवादाचं मूळ पाकमध्येच, पाकिस्तानची कबुली
इस्लामाबादः दहशतवादाचं मूळ पाकिस्तानातच पोसलं जात असल्याचं पाकिस्ताननेही कबूल केलं आहे. पाक सरकारकडून जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहरसह 5 हजार 100 दहशतवादी संघटनांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत.
देशात दहशतवादी असल्याचं पाकिस्तानने अधिकृतपण मान्य केलं आहे. खाते गोठण्यासाठी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 5 हजार 100 दहशतवाद्यांची यादी बँकांना पाठवली आहे. पाकिस्तानात बसून जगभरात दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांचा या यादीत समावेश आहे.
दहशतवाद्यांच्या खात्यात एकूण 40 कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. जैश-ए-महम्मदच्या मसूद अजहर याचं स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील खातंही गोठवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 27 दहशतवाद्यांचे खाते आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement