एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जगातील निम्मी संपत्ती 'या' 8 श्रीमंतांकडे!
मुंबई : जगातील 50 टक्के लोकांकडे जितकी संपत्ती आहे, तितकीच संपत्ती जगातील 8 सर्वात श्रीमंतांकडे एकवटली आहे. गरिबीविरुद्ध लढणाऱ्या 'ऑक्सफॉम' या जागतिक संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
आठही श्रीमंत पुरुष, पैकी 6 अमेरिकेतले!
विशेष म्हणजे या सर्वात श्रीमंत 8 जणांमध्ये सर्वच्या सर्व पुरुष आहेत. शिवाय, 'ऑक्सफाम'ने ज्या 8 श्रीमंतांचा उल्लेख आपल्या यादीत केला आहे, त्यामध्ये 6 उद्योगपती अमेरिकेतील, तर स्पेन आणि मेक्सिकोमधील प्रत्येक एक उद्योगपतीचा समावेश आहे.
गरिबीची विदारक दरी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक समिटआधीच 'ऑक्सफॉम'ने श्रीमंत-गरिबांमधील विदारक दरी दाखवणारी आकडेवारी जाहीर केली आहे. याच यादीतील भारत आणि चीनमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की, जगातील निम्मी गरीब जनता आणखी गरिबीच्या खाईत लोटली जात आहे. याआधी म्हणजे 2010 साली 43 श्रीमंतांकाडे जगातील 50 टक्के लोकांच्या संपत्तीएवढी संपत्ती एकवटली होती.
बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्गही यादीत
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोज यांचा जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
जगातील 8 सर्वात श्रीमंत व्यक्ती :
1. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (संपत्ती- 5 लाख कोटी रुपये)
2. इंडिटेक्सचे संस्थपक अमांसियो ऑर्टेगा (संपत्ती- सुमारे 4.5 लाख कोटी रुपये)
3. वॉरेन बफेट (संपत्ती- सुमारे 4.14 लाख कोटी रुपये)
4. मेक्सिकन उद्योगपती कार्लोस स्लिम (संपत्ती- 3.6 लाख कोटी रुपये)
5. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस (संपत्ती- 3 लाख कोटी रुपये)
6. फेसबुकचे सहसंस्थापक, सीईओ मार्क झुकरबर्ग (संपत्ती- 2.95 लाख कोटी रुपये)
7. ओरेकल कॉर्पचे लॅरी एलिसन (संपत्ती- 2.9 लाख कोटी रुपये)
8. न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग (संपत्ती- 2.7 लाख कोटी रुपये)
भारतातील स्थिती काय?
दरम्यान, भारतातील 57 अब्जाधीशांची संपत्ती देशातील 70 टक्के जनतेच्या बरोबर असल्याची धक्कादायक आकडेवारी याच रिपोर्टमधून समोर आली आहे. तर मागच्या दोन दशकांमध्ये भारत, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंकेमध्ये 10 टक्के लोकांची संपत्ती 15 टक्क्यांनी वाढली आहे, तर 10 टक्के लोकांची संपत्ती 15 टक्क्यांनी कमी झाल्याचंही 'ऑक्सफॉम' या संस्थेची आकडेवारी सांगते.
'ऑक्सफाम'च्या अहवालात आणखी काय म्हटलंय?
'अॅन इकॉनॉमी फॉर द 99 पर्सेंट' या आपल्या रिपोर्टमध्ये 'ऑक्सफाम'ने म्हटलंय, ब्रेक्झिटपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी विजयापर्यंत, वंशवादात वाढ होत आहे आणि राजकीय भूमिकांमुळे चिंता वाढत जाते आहे. शिवाय, अधिकाधिक देशांमध्ये सद्यस्थिती सहन न करण्याचे संकेतही दिसू लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement