(Source: ECI/ABP News/ABP Majha)
South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे 306 हून अधिक लोकांचा मृत्यू
South Africa Flood : सुमारे 120 शाळा पुरामुळे पाण्याखाली गेल्या असून अंदाजे 26 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.
South Africa Flood : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसा आहे. पुरामुळे सुमारे 306 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे पूर परिस्थिती आहे. अनेक घरे कोसळली असून इमारतींचेही नुकसान झाले आहे. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे 52 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे 120 शाळा पुराच्या पाण्याने वेढल्या आहेत. अंदाजे 26 दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत.
18 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू
शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी माहिती दिली की, पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे 18 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. एका निवेदनात त्यांनी सांगितले की, 'ही एक दु:खद बाब आहे आणि यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा गरीब देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका; संयुक्त राष्ट्राची माहिती
- India : रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेची भारताला सूचना, मंत्री जयशंकर यांच्या उत्तराने...
- Infosys : भारताची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला! जाणून घ्या कंपनीने का घेतला हा निर्णय?
- Elon musk offers : एलन मस्क ट्वीटर खरेदी करणार? कंपनीला दिली 'ही' ऑफर आणि धमकी!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha