भारत-पाक युद्धात ड्रोनचा वापर का करण्यात येतोय?
why drone used in india : भारत पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या युद्धात ड्रोनचा वापर करण्यात येतोय.

why drone used in india : जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (pahalgam terror attack) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा (pahalgam terror attack) मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) सुरुवात केली आहे. भारताने पाकमधील (INDIA PAKISTAN WAR) दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकनेही भारताला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. सध्या भारत पाकमध्ये युद्धच सुरु झालंय. मात्र, या युद्धामध्ये चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे ड्रोन... भारत पाकने एकमेकांवर ड्रोनने हल्ले केले आहेत.
दरम्यान, आज (दि.9) कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानच्या 400 ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता आणि 36 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानने या हल्ल्यांसाठी तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला होता. मात्र, भारताने या हल्ल्याला सडेतोड प्रत्तुत्तर दिलंय. दरम्यान, भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.
ड्रोनचा वापर का करण्यात येतोय?
ड्रोन बराच काळ हवेत फिरु शकतात. शिवाय टार्गेट दिसलं की, बरोबर जाऊन धडकतात. ब्लॅकआऊट केल्यास ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण मिळू शकतं. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेने सर्वात पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला होता. गेल्या काही वर्षात रशिया आणि युक्रेनने देखील या ड्रोनचा वापर केला आहे.
ड्रोनचा वापर मानवी जीविताच्या धोक्याशिवाय हल्ले करण्यासाठी आणि माहिती संकलनासाठी केला जातो, ज्यामुळे खर्चात बचत होते आणि सैनिकांच्या सुरक्षिततेची खात्री होते. ड्रोनचा वापर युद्धाच्या रणनीतीत मोठा बदल घडवत आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतांमध्ये वाढ झाली असून, युद्धाच्या स्वरूपातही बदल झाला आहे.
भारताने पाकिस्तानमधील लाहोर शहरावर हल्ले केले. या हल्लात लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्धवस्त करण्यात आली होती. यावेळी ड्रोनचाी वापर करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये भारताने HAROP ड्रोन वापरलाय, ज्यामुळे लक्ष्यावर अचूक हल्ला शक्य झाला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई संरक्षण क्षमतांची चाचणी घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला. पाकिस्तानने दावा केला की, त्यांनी 25 भारतीय ड्रोन पाडले, ज्यात काही HAROP ड्रोन होते. ड्रोनचा वापर सीमावर्ती भागांमध्ये निगराणी आणि माहिती संकलनासाठी करण्यात येतो. यामुळे लष्करी हालचालींची माहिती मिळवणे सोपे होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ड्रोन हल्ल्यांना भारतेच चोख प्रत्त्युतर; गुरुवारी रात्री काय घडलं, पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे























