एक्स्प्लोर

India pakistan war ड्रोन हल्ल्यांना भारताचे चोख प्रत्त्युतर; गुरुवारी रात्री काय घडलं, पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे

India pakistan war पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की, त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती.

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना (Terrorist) घरात घुसून मारले. त्यानंतर, चवताळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानने भारतातील विविध शहरांत ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय वायू दलाने पाकचे ड्रोन हवेतच जिरवले. आता, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी (Sofia qureshi) आणि व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन कालच्या युद्धभूमीवरील घडामोडींची माहिती दिली. पाकिस्तानने (Pakistan) सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने पाडले. 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की, त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. हे ड्रोन तुर्कीचे होते. पाकिस्तानने टाकलेले बहुतेक ड्रोन भारताने नष्ट केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग याही उपस्थित होत्या. 

पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

8 मे रोजी गुरुवारी रात्री  8 ते 9 मे दरम्यान पाकिस्ताननं भारतीय हवाई सीमेचं उल्लंघन केलं, नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तान सैन्याची गोळीबारी, पाकिस्तानने जम्मू काश्मिरमध्ये उरी, पूँच, राजोरी, उधमपूर, अकनूरसह विविध ठिकाणी ड्रोनहल्ले केले. 

आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेवर 300 ते 400 ड्रोनचा वापर, भारतानं यातील बहुतांश ड्रोन पाडले

पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हवाई घुसखोरीचा प्रयत्न, एअर डिफेन्स यंत्रणेची माहिती गोळा करणे, गोपनीय माहिती गोळी करण्याचा प्रयत्न 

ड्रोनच्या अवशेषांवरुन समजतं की, ते ड्रोन तुर्की बनावटीचे आहेत.

पाकिस्तानच्या सशस्त्र UAV ने भंटिडा सैन्य स्टेशनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तो निष्क्रीय करण्यात आला

भारताकडून पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आली.

उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारात भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाल्याची माहिती दिली. 

पाकिस्तानकडून झालेला ड्रोन हल्ला हा सैन्य दलाच्या प्रतिष्ठेला नागरिकांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न होता. 

हेही वाचा

पाकड्यांशी लढताना 'उरी'मध्ये मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget