एक्स्प्लोर
Advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी किम जोंग सिंगापुरात दाखल
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहे. या भेटीसाठी किम जोंग सिंगापूरमध्ये दाखल झाला आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसिद्धता या भेटीच्या केंद्रभागी असेल.
सिंगापूर : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहे. या भेटीसाठी किम जोंग सिंगापूरमध्ये दाखल झाला आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसिद्धता या भेटीच्या केंद्रभागी असेल.
गेल्या काही महिन्यांपासून अण्वस्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने चालवली आहे. त्यामुळे किम जोंगला संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तसंच अमेरिकेने उत्तर कोरियाला कारवाईची धमकीही दिली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे प्रमुखांनी भेटून सामंजस्याने चर्चाही केली होती. दरम्यान आजच्या किम-ट्रम्प भेटीने कोरियाई युद्धाला औपचारिक पूर्णविराम मिळणार आहे.
किम जोंग उन काही वेळापूर्वीच एअर चायना 747 ने सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी ते बीजिंगमध्ये गेले आणि तिथून ते विमान बदलून सिंगापूरसाठी रवाना झाले. दरम्यान किम जोंग आपल्या ताफ्यासह सिंगापूरला गेले आहेत. त्यांच्या ताफ्यात 20 हून अधिक गाड्या असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement