उत्तर कोरियाचा हुकूमशाह Kim Jong Un च्या वजनात घट, नागरिक चिंतेत
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु आहे. त्याचं कमी झालेलं वजन पाहून उत्तर कोरियाचे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मुंबई : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन कायमच चर्चेत असतो. आता किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु आहे. त्याचे कमी झालेलं वजन पाहून उत्तर कोरियाचे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. याआधी त्याच्या प्रकृतीविषयी काही ना काही बातम्या येत होत्या. परंतु आता एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या किम जोंग उनचं घटलेलं वजन पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
किम जोंग उनचं वजन सातत्याने कमी होत आहे. काही महिन्यांमधील त्यांचे फोटो पाहता त्याचं वजन आधीच्या तुलनेत फारच कमी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. तो आधीपेक्षा बारीक झाला आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
किम जोंग उनचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या किम जोंग उनला पाहून अनेकांना धक्का बसला, कारण त्याचं वजन फारच कमी झालेलं होतं. परंतु वजन कमी झाल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिक फक्त अटकळ बांधत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तरुणाने सांगितलं की, "किम जोंग उन फारच बारीक आणि अशक्त दिसत आहे. त्याची ती अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी तरळलं."
Before-and-after videos show that North Korean leader Kim Jong Un noticeably lost weight. On Sunday, the country's state media offered a rare public segment on it, although the reason for the weight loss is unclear. Read more https://t.co/kAmlhBekEy pic.twitter.com/XBawAHBuag
— Reuters India (@ReutersIndia) June 28, 2021
खरंतर किम जोंग उनच्या वजनाबाबतची चर्चा सर्वात आधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाली होती, कारण तो मोठ्या काळानंतर कॅमेऱ्याच्या समोर आला होता. तेव्हापासून सगळेच जण त्याच्या प्रकृतीविषयी विविध अंदाज बांधू लागले होते.
किम जोंग उनच्या प्रकृतीवर सगळ्यांच्या नजरा
आता सगळ्यांच्या नजरा केवळ किम जोंग उनच्या तब्येतीवर खिळल्या आहेत. उत्तर कोरियात त्याची हुकूमशाही आहे. त्याने घेतलेल्या क्रूर निर्णयांची सातत्याने चर्चा असते. परंतु त्याचं वजन कमी होणं यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे सगळ्यांना किम जोंग उनच्या कमी झालेल्या वजनाची चिंता सतावत आहे
मागील वर्षी उत्तर कोरियाचे संस्थापक किम II संग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात किम जोंग उन सहभागी न झाल्याने त्याच्या तब्येतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. आता कमी झालेलं वजन आणि बारीक झालेल्या किम जोंग उनला पाहून त्याची तब्येत ढासळल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
