New Outbreak : धोक्याची घंटा! उत्तर कोरियामध्ये नवा आजार, विषाणूंचा आतड्यांवर हल्ला
New Outbreak in North Korea : उत्तर कोरियाच्या पश्चिमेकडील शहर हेजूमध्ये नवीन रोगाचा प्रसार होतान पाहायला मिळालं आहे. हा विषाणू आतड्यांवर हल्ला करतो.
New Outbreak in North Korea : जगभरात एकीकडे कोरोना विषाणूचा कहर कमी होताना दिसत नाही आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरियामध्ये नवा आजारचा फैलाव होताना पाहायला मिळत आहे. यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात उत्तर कोरियामध्ये एक नवीन संसर्गजन्य रोग पसरत आहे. उत्तर कोरियाची आरोग्य व्यवस्था आधीच कोलमडली असताना आता या नवीन आजारामुळे संकट अधिक वाढलं आहे.
उत्तर कोरियाच्या पश्चिम बंदराकडील शहर हेजू इथं नवीन आजारानं डोकं वर काढलं आहे. उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यानं गुरुवारी या नवीन विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी औषधांची खेप पाठवली आहे. हा नवा आजार किती धोकादायक आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा विषाणू पोटावर आणि आतड्यावर हल्ला करतो. मात्र याचा धोका किती आणि काय आहे याबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेलं नाही.
किम जोंग उननं हा नवीन आजार लवकरात लवकर थांबवण्यावर भर दिला आहे. यासोबतच तो अधिक पसरू नये यासाठी अनेक सूचनाही दिल्या आहेत. या नवीन आजाराची लागण झालेल्या संशयित रुग्णांना तात्काळ अलग ठेवण्याचे आदेश आहेत. उत्तर कोरियामध्ये गेल्या महिन्यात कोरोनामुळे आणीबाणी लागू करण्यात आली होती. कोरोना महामारीशी लढण्यासाठी आधीच उत्तर कोरियामध्ये औषधांचा आणि लसींचा मोठा तुटवडा असल्याने येथील आरोग्य व्यवस्था बिकट आहे. आता हा नवीन आजार कितपत धोकादायक आहे, याबाबत सध्या अभ्यास सुरु आहे.