Nobel Prize 2020 : पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल
Nobel Prize 2020 : नोबेल पुरस्कारांमधील सहावा आणि सर्वात शेवटचा अर्थशास्त्रातील पुरस्कार पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आला आहे.
Nobel Prize 2020 : यंदा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आला आहे. नोबेल पुरस्कार समितीने सोमवारी यंदाच्या सहाव्या आणि शेवटच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. मिलग्रोम आणि विल्सन यांना हे पुरस्कार ऑक्शन थिअरीमध्ये (लिलाव सिद्धांत) सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतींचा शोध लावल्यामुळे देण्यात आला आहे.
नोबेल पारितोषिकांत सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.27 कोटी) दिले जाते. स्वीडिश क्रोना हे स्वीडनचे चलन आहे. हा पुरस्कार स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेलच्या नावे देण्यात आला आहे. यापूर्वी यावर्षीचे नोबेल पुरस्कार रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासह अनेक क्षेत्रात जाहीर करण्यात आले आहे.
BREAKING NEWS: The 2020 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Paul R. Milgrom and Robert B. Wilson “for improvements to auction theory and inventions of new auction formats.”#NobelPrize pic.twitter.com/tBAblj1xf8
— The Nobel Prize (@NobelPrize) October 12, 2020
नोबेल शांतता पुरस्कार
नॉर्वेच्या नोबेल समितीने वर्ल्ड फूड प्रोग्रामला (डब्ल्यूएफपी) 2020 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना सन 1961 पासून उपासमारीविरूद्ध लढा देत आहे. अन्न सुरक्षेच्या माध्यमातून जगातील मोठ्या लोकसंख्येला मूलभूत शक्ती दिली जाऊ शकते.
साहित्यातील नोबेल पुरस्कार
गुरुवारी 2020 साठी साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अमेरिकेच्या कवी लुईस गल्क यांना यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अॅकॅडमीने ट्विट केले आहे की 2020 च्या साहित्याचे नोबेल पारितोषिक अमेरिकन साहित्यिक लुईस गल्क यांना व्यक्तिगत अस्तित्वाला आवाज देणाऱ्या कवितांसाठी दिले जात आहे. लुईस ह्या अतिशय आदरणीय लेखिका आहेत. सामाजिक विषयांवरही त्या खूप सक्रिय आहेत.
रसायनशास्त्रील नोबेल पुरस्कार
यंदाच्या वर्षाचे रसायनशास्त्रील नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली. इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. जीनोम एडिटिंगच्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. 'स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या समितीने ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी लिथियम-आयर्न बॅटरी बनवणारे वैज्ञानिक जॉन बी. गुडनिफ, एम. स्टॅनली विटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
भौतिकशास्त्रातील नोबेल
रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने 2020 मधील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा एक भाग रॉजर पेनरोस आणि दुसरा भाग संयुक्तपणे रेनहार्ड गेन्जेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉजर पेनरोझ यांनी ब्लॅक होल फॉरमेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अंदाज लावला जाऊ शकतो, याचं संशोधन केलं आहे. तर रेनहार्ट आणि अँड्रिया यांनी आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध लावला आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा नोबेल पारितेषिक देऊन गौरव करण्याय येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nobel Peace Prize 2020 : वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020 चा नोबेल शांतता पुरस्कार
- वैद्यकीय क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर, तीन शास्त्रज्ञांना 'हिपॅटायटीस सी' विषाणूच्या शोधासाठी पुरस्कार
- Noblel Prize | इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना यांना रसायनशास्त्रील नोबेल
- Noble Prize | रॉजर पेनरोस, रेनहार्ड गेन्जेल, अँड्रिया गेज यांना भौतिकशास्त्रातील नोबेल