Noble Prize | यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर
Nobel Peace Prize 2022 : जागतिक स्तरावरील सर्वात मानाचे पुरस्कार असणारे नोबेल पुरस्कार वाटप सुरु असून यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशिया आणि युक्रेनच्या मानवाधिकार संघटनाना जाहीर झाला आहे.
![Noble Prize | यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर Nobel Peace Prize 2022 Announced Awarded to Ales Bialiatski Human Rights Advocate Belarus Noble Prize | यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/b4bd8f1be016cdbe740745def8ab96ee1665134518290323_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nobel Peace Prize 2022 : जगभरातील सर्वात मानाचे आणि बहुप्रतिक्षित पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार (Nobel Prize). यंदाचे नोबेल पुरस्कार आता जाहीर होत असून (Nobel Prize 2022) 2022 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे.
Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्यांना दिला जाणारा हा शांतता पुरस्कार यंदा मानवधिकार हक्कांसाठी लढणारे वकिल अॅलेस बिलियात्स्की आणि रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी रशियाचे दिमित्री मुराटोव्ह आणि फिलीपिन्सच्या मारिया रेसा या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार मिळाला होता.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2022
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2022 #NobelPeacePrize to human rights advocate Ales Bialiatski from Belarus, the Russian human rights organisation Memorial and the Ukrainian human rights organisation Center for Civil Liberties. #NobelPrize pic.twitter.com/9YBdkJpDLU
यंदा 3 ऑक्टोबरपासून 2022 साठीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी सोमवारी (3 ऑक्टोबर) वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना देण्यात येणार आहे. तर मंगळवारी भौतिक शास्त्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. तर साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला. ज्यानंतर आज शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
कसा आहे नोबेल पुरस्काराचा इतिहास?
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
हे देखील वाचा
Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)