एक्स्प्लोर

Anil Menon for Moon Mission : भारतीय वंशाचा अनिल चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, NASA चं मून मिशन लवकरच

अद्यापर्यंत एकही भारतीय चंद्रावर पाऊल ठेवू शकलेला नाही. पण आता भारतीय वंशाचा अनिल मेनन (Anil Menon) चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Anil Menon for Moon Mission : मनुष्य जातीचा किती विकास झाला आहे? हे सांगताना हमखास दिलं जाणारं उदाहरण म्हणजे माणूस चंद्रावर पोहोचला आहे, हेच असतं. पण असं असताना देखील अद्यापर्यंत एकही भारतीय चंद्रावर पाऊल ठेवू शकलेला नाही. पण आता भारतीय वंशाचा अनिल मेनन (Anil Menon) चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन स्पेस एजेन्सी NASA लवकरच एक मून मिशन करणार असून यासाठी10 ट्रेनी एस्ट्रोनॉट्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय वंशाचा अनिल मेनन हा देखील आहे.

45 वर्षीय अनिल NASA च्या 2021 च्या क्लासमध्ये होता. अनिलने अमेरिकन एयरफोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणूनही काम केंल आहे. तसचं स्पेसएक्समध्ये तो फ्लाइट सर्जन म्हणूनही कार्यरत होता. दरम्यान मून मिशनमध्ये सहभागी होणाऱ्या 10 जणांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. तब्बल 50 वर्षानंतर NASA चंद्रावर पुन्हा माणसांना पाठवणार आहे. अनिलने भारतात पोलिओ अभियानच्या अभ्यासाकरता 1 वर्ष भारतात घालवलं आहे.

4 भारतीय अंतराळात गेले होते

आतापर्यंत एकाही भारतीयाने चंद्रावर पाऊल ठेवलं नसलं तरी चार भारतीय अंतराळात गेले आहेत. यामध्ये सर्वात आधी राकेश शर्मा त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विलियम्स आणि राजा चारी हे अंतराळात गेले होते. त्यामुळे जर अनिल NASA च्या मून मिशनमधून चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी झाला तर तो पहिला भारतीय वंशाचा व्यक्ती असेल जो चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी होईल.

अनिल करणार 2 वर्षांच ट्रेनिंग 

मून मिशनसाठी 12 हजार जणांचे अर्ज आले होते. ज्यामधून केवळ 10 जणांची निवड या अभियानाकरता झाली आहे. हे सर्वजण जानेवारीमध्ये टेक्सासच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये रिपोर्ट करतील. ज्यानंतर 2 वर्षांच ट्रेनिंग त्यांना दिलं जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 2025 मध्ये पहिली महिला आणि एक पुरुष यांना चंद्रावर पाठवलं जाणार आहे. अनिलशिवाय निवडण्यात आलेल्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. - निकोल एयर्स, मार्कोस बेरियोसो, ल्यूक डेलाने, जेसिका विटनर, डेनिज बर्नहॅम, जॅक हॅथवे, क्रिस्टोफर विलियम्स, क्रिस्टीना बिर्चो आणि आंद्रे डगलस.

कोण आहे अनिल मेनन?

अनिल मेननचे आई वडील भारतीय आणि यूक्रेनियन असून तो अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये वाढला आहे. मेनने 1999 मध्ये हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये न्यूरोबायोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. 2004 मध्ये कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी अनिलने मॅकेनिकल इंजीनियरिंग केली. स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्याने डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. NASA च्या अनेक अभियानांमध्ये अनिलने सहभाग घेतला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget