बॉसने झूमवर मिटिंग बोलावली; अवघ्या तीन मिनिटांत 900 जणांना नोकरीवरून काढले
CEO fires 900 employees in three minute: Better.com च्या सीईओने अवघ्या तीन मिनिटांच्या झूम मिटिंग कॉलमध्ये 900 जणांना नोकरीवरून कमी केले.
Better.com CEO Fires 900 Employees in Three Minute: अमेरिकेत न्यूयॉर्कमधील एक कंपनीच्या सीईओने अवघ्या तीन मिनिटांमध्ये 900 जणांना नोकरीवरून कमी केले. मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या बैठकीत कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी झूम मिटिंग बोलावली. ही बैठक नेहमीप्रमाणे कामाशी संबंधित असेल अनेकांना वाटले होते. मात्र, ही मिटिंग 900 जणांसाठी कंपनीमधील शेवटची मिटिंग ठरली.
Better.com या कंपनीतून ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कंपनीमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के इतकी आहे. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये सुट्टीचा काळ सुरू होणार आहे. त्याआधीच कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. कंपनीने या निर्णयाबाबत कोणतीही सूचना अथवा इशारा दिला नव्हता. Better.com या कंपनीमध्ये जपानमधील एक सॉफ्ट बँकेची गुंतवणूक आहे. सध्या या कंपनीचे बाजारमूल्य 7 अब्ज डॉलर इतके आहे.
बैठकीत काय झाले?
कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने म्हटले की, बैठकीत तीन मिनिटांमध्ये त्यांना एक गुलाबी रंगाचा कागद दिला, ज्याचा अर्थ त्यांची नोकरी गेली. कर्मचाऱ्याने म्हटले की, बाजारपेठ बदलली आहे. आम्हाला जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.
कर्मचाऱ्यांवर लागले हे आरोप
सीईओ विशाल गर्ग यांनी बैठकीत कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप केला. तुम्ही लोक फक्त दोन तास काम करतात, कंपनीच्या व्यवसायात, कामात कोणतेही योगदान देत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर HR विभागातून एक ई-मेल येईल असे सांगत नोकरीवरून कमी केले असल्याचे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज
लवकरच Nifty 50 आणि बँक निफ्टीत बदल, जाणून घ्या कोणता स्टॉक असेल इन अन् कोणता आऊट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha