एक्स्प्लोर
सूर्याजवळ पृथ्वीसारखाच ग्रह, नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा
न्यूयॉर्क : पृथ्वीसारखाच एक ग्रह सूर्याजवळ फिरताना नासामधील शास्त्रज्ञांना आढळला आहे. हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ दिसला असून त्यावर अंधुक प्रकाशही असल्याचं स्पष्ट झालं आहे. अंतराळ संशोधनात ही महत्वाची घटना असल्याने आता या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करणार आहेत.
सध्या या ग्रहाबद्दल 31 शास्त्रज्ञांची टीम संशोधन करत आहे. या ग्रहाला प्रॉक्झिमा बी असं नाव देण्यात आलं आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 1.3 मोठा असून फक्त 11 दिवसांमध्ये सूर्याचं परिभ्रमण करतो. तसंच हा ग्रह एकटा भ्रमण करत नसल्याचा अंदाजही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
2013 साली सर्वप्रथम हा ग्रह दिसून आला होता, त्याबद्दल आता नवीन खुलासे समोर आल्याने डिस्कव्हरीने 100 दशलक्ष डॉलरची मोहिम आखण्याचं ठरवलं आहे. पृथ्वीव्यतिरीक्त अन्य कुठल्या ग्रहावर वातावरण आणि पाण्याचा अंश आहे का याचाही शोध संशोधक बऱ्याच काळापासून घेत आहेत.
दरम्यान या ग्रहाची कक्षा प्रॉक्झिमिटी बी अशी संबोधण्यात आली आहे. तसंच त्याच्या कक्षेचा अभ्यास करुन या ग्रहावर पाणी, वातावरण आणि जीवसृष्टी आहे का याचाही अभ्यास केला जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 4.2 प्रकाशवर्ष दूर आहे आणि 1995 पासून सूर्याच्या अत्यंत जवळ असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement