Himalayas : अंतराळातून असा दिसतो पर्वतराज हिमालय; दृश्य पाहून नेटकरी अवाक्
एकदातरी प्रत्यक्षात हिमालयाच्या या पर्वतरांगा पाहण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. काहींना ही इच्छा पूर्ण करण्याची संधीही मिळते.
नवी दिल्ली : पुराणकथांपासून ते अनेक संशोधनांपर्यंत हिमालय पर्वतरागांचा उल्लेख पाहायला मिळतो. एकदातरी प्रत्यक्षात हिमालयाच्या या पर्वतरांगा पाहण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. काहींना ही इच्छा पूर्ण करण्याची संधीही मिळते. सध्या अशीच संधी मिळाली एका अशा व्यक्तीला ज्यानं हिमालयाची दृश्य ही साऱ्या जगाच्याच भेटीला आणली आणि पर्वराजाची ही झलक पाहून सारेच अवाक् झाले.
इंटरनॅशनल स्पेस सेंटर येथे काम करणारे नासाचे अंतराळ संशोधक आणि फ्लाईट इंजिनियर Mark T Vande Hei यांनी नुकताच हिमालय पर्वतरांगांचा नेत्रदीपक फोटो शेअर केला. अंतराळातून ही पर्वतांची रांग नेमकी दिसते तरी कशी, याची स्पष्टोक्ती या फोटोच्या माध्यमातून होत आहे. निसर्गाची किमया म्हणा किंवा दैवी चमत्कार, ही पर्वतशृंखला पाहताना एकदाच साकारली जाणारी कलाकृती ज्याप्रमाणे पाहणाऱ्यांच्या मनावर आरुढ होते, तसंच काहीसं होत आहे.
Environment Day Special : लिव्हिंग रुट ब्रिज; मेघालयातील निसर्गाचा अद्भूत आविष्कार
भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारी भागाला दुभागणाऱ्या हिमालय पर्वतरांगा दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये स्थिरावल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक उंच शिखरं या पर्वतशृंखलेचा भाग आहेत. ज्यामध्येच माऊंट एव्हरेस्टही सहभागी आहे. अशा या पर्वतरांगेची झलक सर्वांना अविश्वसनीय वाटली.
Somewhere on a clear, bright day in the Himalayas. I can’t get enough views like this. pic.twitter.com/1QNylAIqAF
— Mark T. Vande Hei (@Astro_Sabot) June 2, 2021
How beautiful ! 🤩Looks like we can touch the snow❄️ ! It's incredible ! Thank you very much Mark !👏👍🌏🌍🌎
— Mira La Praline 🌺 (@MiraLaPraline) June 2, 2021
Such a majestic view 😍 I should say you guys are so fortunate that us
— Ram (@t00reytwi) June 2, 2021
SPECTACULAR!!!🌟🌟🌟✨✨✨
— Gloria Chairez (@vulcan54) June 3, 2021
THANK-YOU FOR SHARING.
Breathtaking!!
— Roe Barra (@BarraRoe) June 3, 2021
सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्याच्या वेगानं पसरला आणि मग त्यावर प्रतिक्रियांची बरसात होण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आणि हिमालयाच्या फोटोच्या निमित्तानं अगदी हा हिमालयची सर्वांच्याच जवळ आला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.