एक्स्प्लोर
शिखर परिषदेत नरेंद्र मोदी ट्रम्प आणि शिंजो आबेंसोबत करणार बैठक
परिषदेत नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जापानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इतर देशातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी मोदींनी 'योग फॉर पीस' या कार्यक्रमाला संबोधित केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेराव्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेत नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जापानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इतर देशातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी मोदींनी 'योग फॉर पीस' या कार्यक्रमाला संबोधित केले.
योग कार्यक्रमात मोदी म्हणाले की, "शांतीसाठी योग हे नाव या कार्यक्रमासाठी अगदी योग्य आहे. योग आपल्याला मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतो. सोबतच आपल्या मनाला आणि शरीराला शांत ठेवण्याची शक्ती देतो. जर व्यक्तीचे मन शांत असेल तर कुटुंब, समाजासोबत, देशातही शांती कायम राहिल. आरोग्य, कल्याण आणि शांतीसाठी जगाला भारताकडून योग ही खास भेट आहे."
मोदींची सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुतारेस यांच्यासोबतही बैठक झाली. या वर्षात सौदी अरेबिया आणि भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारताला अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रात सौदी अरेबियाचे सहकार्य मिळाले, अशी माहिती पीएमओ कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळत आहे.
महत्वाच्या असलेल्या हिंद-प्रशांत महासागराच्या क्षेत्रात चीनचा दबदबा वाढत असल्याच्या मुद्यावर नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि शिंजो आबे यांच्यात त्रिपक्षीय बैठक होणार आहे. ही बैठक शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त पार पडणार आहे.
नरेंद्र मोदी रशिया, चीन आणि भारत या तीन देशादरम्यान होणाऱ्या त्रिपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत. ही त्रिपक्षीय बैठक आज (शुक्रवारी) पार पडणार आहे. भारत, रशिया, चीन या देशादरम्यान 12 वर्षानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. चीनच्या दक्षिण समुद्राचं क्षेत्र आपलचं असल्याचा दावा चीन करत आहे. तर दुसरीकडे व्हिएतनाम, ब्रुनेई आणि तैवान या जलमार्गांवर आपला दावा करत आहे. यात प्रमुख समुद्री मार्गाचाही समावेश आहे, ज्यातून दरवर्षी 3,000 अब्ज डॉलर जागतिक व्यापाराचा व्यवहार होतो.
मोदी 1 डिसेंबरपर्यंत अर्जेंटिनामध्ये असतील. त्यादरम्यान ते अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मॉरीसिओ मेक्रिया आणि चिलीचे राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनरा यांचीही भेट घेणार आहेत. त्यासोबतच जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जन धन योजना, मुद्रा योजना, आयुष्मान भारत यासारख्या महत्वपूर्ण विषयावर संवाद साधतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement