एक्स्प्लोर

फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच मुंबईला रवाना होणार आहेत. गणपतीसाठी ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ दरेगावी आले होते.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही वेळातच मुंबईला रवाना होणार आहेत. गणपतीसाठी ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ दरेगावी आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये असलेल्या बैठकीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे..
दरम्यान, यावेळी फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर एकनाथ शिंदे भडकल्याचे पाहायला मिळाले. 

मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही

मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही. जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केले होत 2019, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं. देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण ताकदीने सर्व प्रसंगांना तोडं देऊ. सरकार म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
आत एक बाहेर एक भूमिका नको, आम्ही स्पष्ट भूमिका घेतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेऊ. चर्चेतून चांगला मार्ग काडू असे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांनी सहकार्याचीभूमिका घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी देखील समाजासाठी लढा उभारला आहे. त्यांनी देखील सहकार्य करावं असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक 

आत्तापर्यंत कुणबी नोंदी मिळत नव्हत्या. पण सध्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र मिळू लागली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 10 टक्के आरक्षण आम्ही दिले आहेत. इतर समाजाला जे फायदे मिळतात ते देखील देणं सुरु असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार सकारात्मक होते असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे हे तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत. दरे गावातील सर्व कार्यक्रम त्यांनी  रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

'सरसकट' कुणबीसाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण; पण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे निकाल काय सांगतात?

 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget