एक्स्प्लोर

गळ्यात भगवे रुमाल अन् टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले

फडणवीस साहेब वातावरण थंड ठेवा. पोलीस आमच्या गाड्या अडवत आहेत. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil :  फडणवीस साहेब वातावरण थंड ठेवा. पोलीस आमच्या गाड्या अडवत आहेत. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. वाशीत ठाण्यात सुरू असलेले प्रयोग थांबवा. अडवणूक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा असे जरांगे पाटील म्हणाले. 40 ते 50 पोलिसांनी गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आमच्या गाड्या अडवत आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले. 

महायुतीपासून मराठा समाज बाजूला गेला तर त्यांचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील येणार नाही  

40 ते 50 पोलिसांनी गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आमच्या गाड्या अडवत आहेत. भगवे रुमाल पोलिसांना घालायची वेळ येईल असं कधी वाटलं नाही असे जरांगे पाटील म्हणाले. महायुतीपासून मराठा समाज बाजूला गेला तर त्यांचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील येणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. प्रत्येक वॉर्डात 40 तके 50 टक्के मतदान मराठा समाजाचे असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांची सरकारला गरज आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. अंगावर एक पण केस नसलेले चिचुंदरी लाल दिसते. मी राणे साहेबांना निलेश साहेबांना काही बोललो का? नारायण राणे आणि निलेश साहेबांनी त्याला समजावून सांगाव, नाहीतर त्याला लाल करणार असा इशारा जरांगेंनी दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही 

अभ्यासकांशी चर्चा केली आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही. सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो. सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असे जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही असेही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असे जरांगे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

सहन होतंय तोपर्यंत आपल्या व्यासपीठावर येणाऱ्याचा सन्मान करा, गोंधळ घालू नका, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन 

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Pune Godwoman Fraud: भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Politics: 'खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत', Jayant Patil यांचा Vishal Patil यांना टोला
Washim News : प्रशिक्षण, शेतमाल विक्री केंद्राची इमारत झालीय पांढरा हत्ती
Maharashtra Civic Polls: 'युती की स्वबळ?'; निवडणुकीआधीच BJP ची फिल्डिंग
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचं आहे', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Pre-Poll Vigilance: 'गुंड, समाजकंटकांबरोबर शक्तिप्रदर्शन करू नका', Dhule पोलिसांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Pune Godwoman Fraud: भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
ट्रम्पकडून तगड्या विरोधानंतरही न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत गुजराती मुस्लिम जोहरान ममदानींनी विजय खेचून आणला; गेल्या 100 वर्षातील पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम महापौर
Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
Eknath Shinde CM: एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Abhishek Bachchan On Heart Wrenching Incident: 'तुझे पप्पा मरणारेत ना...?', सुपरस्टार वडिलांना शूटिंगवेळी गंभीर दुखापत, इथे फक्त 6 वर्षांच्या चिमुकल्या स्टारकीडला विचारायचे हादरवणारे प्रश्न
'तुझे पप्पा मरणारेत ना...?', सुपरस्टार वडील मरणाच्या दारात अन् स्टारकीडला विचारायचे हादरवणारे प्रश्न
Embed widget