एक्स्प्लोर

पुणेकरांसाठी गुडन्यूज, सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला; अखेर मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे उद्घाटन 1 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील (Pune) “फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.”

दरम्यान, या उड्डाण पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडीचा मार्ग आणखी सुकर होणार असून पुणेकरांना लांब पल्ल्याच्या उड्डाण पुलाचा वापर करता येईल.

प्रकल्पाची माहिती

- एकूण लांबी: सुमारे २.५ किमी – पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल
- एकूण खर्च: ११८ कोटी रुपये
- कामाचा कालावधी: सप्टेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२५ (नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण)

प्रमुख टप्पे

- प्रथम टप्पा (१५ ऑगस्ट, २०२४): राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल (खर्च १५ कोटी).
- दुसरा टप्पा (१ मे, २०२५): विठ्ठलवाडी ते फनटाईम, २.१ किमी लांबीचा पूल (खर्च ६१ कोटी).
- तिसरा टप्पा (१ सप्टेंबर, २०२५): गोयल गंगा चौक ते इनामदार चौक, १.५४ किमी लांबीचा पूल (खर्च ४२ कोटी).

वाहतुकीची कोंडी होणार कमी

- दररोज हजारो प्रवासी, शालेय बस, व्यवसायिक वाहने आणि सार्वजनिक वाहतूक साधनांचा प्रवास अधिक सुकर.
- सिंहगड रस्त्यावरील प्रमुख चौक विना-अडथळा पार करण्याची सुविधा.
- नागरिकांचा दररोज १५ ते २५ मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार.
- सिंहगड रस्ता, धायरी, नन्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार.

शहरासाठी महत्व

"पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर असून लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सिंहगड रस्ता परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. अशा परिस्थितीत ११८ कोटींचा सिंहगड रस्ता उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला."

हेही वाचा

मोठी बातमी! मंत्रिमंडळ उपसमितीकडून रात्रीच प्रस्ताव तयार होणार, राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget