Video : रुसमध्ये भारताचा डंका, मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार; एकमेकांना 'जादू की झप्पी'
रशियाने 1698 मध्ये ज़ार पीटर द ग्रेट यांच्याद्वारे येशुचे पहले प्रेरित आणि रुस चे संरक्षक संत, सेंट एंड्रयू यांच्या सम्मानार्थ स्थापित, ऑर्डर ऑफ़ सेंट एंड्रयू द एपोस्टल हा पुरस्कार सुरू केला आहे
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून रशियातील मॉस्को शहरात आज मोदींनी भारतीयांना संबोधित केलं. भारतीयांशी संवाद साधताना मोदींनी सिर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी साद घातल भारतीयांची मने जिंकली. त्यानंतर, रशियातील क्रेमलिन येथे आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाच्या (Russia) सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल' हा रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून रशियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या पुरस्काराने गौरव केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याहस्ते क्रेमलिन येथील एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मला मिळालेला पुरस्कार हा भारतातील 140 कोटी भारतीयांचा हा सन्मान असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
रशियाने 1698 मध्ये ज़ार पीटर द ग्रेट यांच्याद्वारे येशुचे पहले प्रेरित आणि रुस चे संरक्षक संत, सेंट एंड्रयू यांच्या सम्मानार्थ स्थापित, ऑर्डर ऑफ़ सेंट एंड्रयू द एपोस्टल हा पुरस्कार सुरू केला आहे. उत्कृष्ट नागरिक किंवा सैन्य योग्यता म्हणून या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं जातं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये भारत आणि रशिया यांच्यातील दूतावासाची घोषणा केली होती.
भारत आणि रशिया यांच्यात विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त रणनीतीक करार तसेच भारत आणि रशियातील मैत्रीपूर्ण संबंधाला अधिक मजबूती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजीच मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता, रशिया दौऱ्यात व्लादीमीर पुतीन यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणावेळी मोदी आणि पुतीन यांची गळाभेटही झाली.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr"><a href="https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&ref_src=twsrc%5Etfw" rel='nofollow'>#WATCH</a> | Russian President Vladimir Putin says, "It gives me pleasure to present this honorary award (Order of St. Andrew) here at the Kremlin...It is the testimony to Russia's sincere gratitude for the significant contribution you are making to strengthening ties between the… <a href="https://t.co/o2ZFudGL0U" rel='nofollow'>pic.twitter.com/o2ZFudGL0U</a></p>— ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1810666215087686013?ref_src=twsrc%5Etfw" rel='nofollow'>July 9, 2024</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
नरेंद्र मोदींचा भारतीयांशी दिलखुलास संवाद
पंतप्रधान मोदींनी भारतीयांना संबोधित करताना भारत आणि रशिया यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर बोलताना मोदींनी आवारा चित्रपटातील राज कपूर यांच्या गाण्याच्या लाईनही बोलून दाखवल्या. या गाण्याचे शब्द ऐकून भारतीयांनीही फिर भी दिल है हिंदुस्थानी... असे म्हणत मोदींना दाद दिली. पुढे बोलताना मोदी म्हणाले, रुस शब्द ऐकताच भारतीयांच्या मनात पहिला शब्द येतो, भारताच्या सुख-दु:खाचा साथी, भारताच विश्वासू मित्र. रुसमध्ये हिवाळ्यात तापमान कितीही खालावलेलं असलं तरी, भारत-रुस यांच्यातील मैत्रीचं तापमान नेहमीच प्लसमध्ये राहिली आहे, एक वेगळीच उब या दोस्तीत आहे. म्युच्युअल ट्रस्ट आणि म्युच्युअल रेस्पेक्टच्या मजबूत धाग्यांनी हे नातं जोडलं गेलंय, असे मोदींनी म्हटले. तसेच, ते गाणं येथील प्रत्येक भारतीयांच्या घरात गायलं जातंय, सिर पर लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी... हे गाणं भलेही जुनं झालं असेल, पण या गाण्यामागील भावना एव्हरग्रीन आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले. तसेच, मोदींनी गाण्याची केवळ एक लाईन म्हटली, सिर पर लाल टोपी रूसी... त्यानंतर भारतीयांनी फिर भी दिल है हिंदुस्थानी.. असे म्हणत मोदींच्या गाण्याला दाद दिली.