एक्स्प्लोर
गँगरेपसाठी सूचना, मुंबईकर तरुणाला अमेरिकेत तुरुंगवास
न्यूयॉर्क : एका मुंबईकर तरुणाने वयाच्या 12 व्या वर्षी अमेरिकेचा रस्ता धरला. मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांच्या संगतीमुळे त्याला तुरुंगवारी घडली आहे. गँगरेपमध्ये सूचना दिल्याच्या आरोपातून सीसील बरोजला तुरुंगवास झाला.
23 वर्षीय सीसील बरोजला गँगरेपमध्ये सहभागाच्या आरोपातून 18 महिन्यांचा तुरुंगवास घडला. 2012 मध्ये गुंगीत असलेल्या महिलेवर गँगरेप करताना बरोजने आरोपींना मार्गदर्शन केल्याचा आरोप आहे. वॉशिंग्टन डीसीमधील मेरिलँडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
बरीजने या गँगरेपमध्ये 'कोच'ची भूमिका बजावत आरोपींना सूचना दिल्याचं म्हटलं जातं. गँगरेपमधील एका आरोपीने सीसीलकडे बोट दाखवलं होतं. कोर्टात ऐकवण्यात आलेल्या एका 35 मिनिटांच्या ऑडिओ क्लीपमध्ये 'होल्ड हर डाऊन' असं सीसीलने म्हटल्याचं ऐकू येतं. 'पुढचं कोण?' असा सवालही त्याने विचारल्याचं रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतं.
सीसीलच्या घरातच हा प्रकार घडला होता. मात्र घटनेच्या वेळी आपण बिअर आणण्यासाठी बाहेर गेलो होतो, म्हणजेच घरी नव्हतो, असा दावा त्याने केला. मात्र सहआरोपीच्या जबानीत सीसील त्यावेळी घरातच असल्याचं म्हटलं गेलं.
सीसील बरोजचा जन्म मुंबईत झाला होता. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी घरादाराचा त्याग केला, तर तो चार वर्षांचा झाला त्यावेळी त्याची आई यूएसला स्थायिक झाली. सीसील, त्याची धाकटी बहीण आणि आजी-आजोबा झोपडपट्टीत राहायचे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement