(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mt. Everest New Height: जगातील उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची वाढली
नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञावली यांनी सांगितलं की, एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर आहे, जी पूर्वीपेक्षा 2.8 फूट जास्त आहे.
नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंचीबाबत आश्चर्यचकीत बाब समोर आली आहे. एक वर्षभर उंचीसंबधी गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनंतर नेपाळ सरकारने मंगळवारी माऊंट एव्हरेस्टची नवीन उंची जाहीर केली. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञावली यांनी सांगितलं की, एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर आहे, जी पूर्वीपेक्षा 2.8 फूट जास्त आहे.
भूकंपानंतर उंची कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती
2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपानंतर, असा अंदाज व्यक्त केला जात होता की माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर इतकी राहिली नाही. म्हणून नेपाळने जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्याची तयारी केली. यानंतर नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज माउंट एव्हरेस्टची अधिकृत उंची 8848.86 मीटर जाहीर केली आहे.
2005 मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यात आली होती, त्यावेळी उंची 8844.43 मीटर होती. आती ही उंची 8848.86 झाली आहे. अशारीतीने एव्हरेस्टची उंची 2.8 फुटांनी वाढली आहे.
उंची बाबत काय होते वाद?
2015 नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर असं बोललं जात होतं की माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर राहिली नाही. यामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची मोजण्याचं ठरवलं. नेपाळने चीनसोबत मिळून या काम केलं आहे. चीनने काही दिवसांपूर्वी 30 सदस्यांचं सर्वेक्षण दल नेपाळमध्ये पाठवलं होतं. माऊंट चोमोलुंगमा बेस कॅम्पवरुन एव्हरेस्टची चढाई या दलाने सुरु केली होती. चीन आणि नेपाळने संयुक्तरित्या माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम केलं.