एक्स्प्लोर

शर्यतीची अंतिम रेषा पार करण्यापूर्वी अपघात, रेसर कार्लिन ड्यूनचा मृत्यू

यूएसएतील कोलरॅडोमध्ये पाईक्‍स पीक इंटरनॅशनल हिल क्‍लाईंब स्पर्धा सुरु असताना बाईक रेसर कार्लिन ड्यूनचा अपघाती मृत्यू झाला

मुंबई : माऊण्टन बाईक रेसिंगच्या क्षेत्रामध्ये प्रख्यात असलेला क्रीडापटू कार्लिन ड्यूनच्या अपघाती मृत्यूमुळे जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शर्यत सुरु असताना अंतिम रेषा पार करण्यापूर्वी झालेल्या अपघातात कार्लिनला मृत्यूने गाठलं. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी कार्लिनने जगाचा निरोप घेतला. यूएसएतील कोलरॅडोमध्ये पाईक्‍स पीक इंटरनॅशनल हिल क्‍लाईंब स्पर्धा सुरु असताना रविवारी ही दुर्घटना घडली. अंतिम रेषेच्या दिशेने कूच करताना कार्लिनची 2019 Ducati Streetfighter V4 Prototype बाईक अपघातग्रस्त झाली. यामध्ये कार्लिनचा जागीच मृत्यू झाला. ही स्पर्धा एकूण 12.42 मैल लांबीच्या टप्प्यात पार पडत असून त्यामध्ये 156 वळणांचा समावेश आहे. 9 हजार 390 फूट उंचीवर स्पर्धेला सुरुवात होते. तिथपासून डोंगराच्या 14 हजार 115 फूट उंचावरील अंतिम रेषेपर्यंत स्पर्धकांना प्रवास करावा लागतो. कार्लिन या स्पर्धेचा गतविजेता होता. त्याने 2011, 2012 आणि 2013 अशा सलग तीन वर्षांसह गेल्या वेळी (2018) चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. मात्र चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा रेसर पाचव्यांदा हा किताब जिंकण्यापूर्वीच काळाच्या पडद्याआड गेला. स्पोर्ट्स बाईकबाबत कार्लिनची पॅशन ही चाहत्यांसाठी चर्चेचा विषय होती. 2014 ते 2017 या कालावधीत बाईकिंगमधून ब्रेक घेऊन कार्लिनने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. 'डस्ट ऑफ ग्लोरी 2' या कार्लिनच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटात त्यानेच भूमिका केली होती. कार्लिनचे वडीलही व्यावसायिक बाईक रायडर होते. कार्लिनने आपल्या कारकीर्दीची सुरुवात बाईक सेल्समन म्हणून केली होती. 14 हजार फूटाच्या उंचीवर पोहचून रेस संपवण्याचा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाही, तो प्रत्यक्ष घेण्यासारखा आहे, असं कार्लिन म्हणायचा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Nawab Malik: भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Nawab Malik: भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम; नवाब मलिकांच्या घरात किती जणांना उमेदवारी? एकूण नावे समोर आली!
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
Embed widget