(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Titanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी बेपत्ता, 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन
Titanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे.
Titanic tourist submersible goes missing : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. रविवारपासून या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. फक्त 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाकडून शोधमोहिम राबवली आहे.
फक्त 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन -
अमेरिकन कोस्ट गार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपर्यंत पाणबुडीमध्ये 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असेल. पाणबुडी शोधण्यासाठी खूप कमी वेळ आहे. शोधमोहिम वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. 58 वर्षीय हार्डिंग एक एक्सप्लोररदेखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या पर्यटनाबाबतची माहिती दिली होती. गेल्यावर्षी नामीबियातून भारतात चिते आणण्यात हार्डिंग यांचाही सहभाग होता. हार्डिंग चित्यांना घेऊन येणाऱ्या त्या विमानाचे पायलट होते.
अटलांटिक महासागरात शोधमोहिम -
अमेरिका आणि कॅनाडा यांच्याकडून सुरु असलेल्या शोधमोहित काहीही समोर आलेले नाही. दोन्ही देशाच्या रेस्क्यू टीम पाण्यात पाणबुडीचा शोध घेत आहेत. पाणबुडीच्या शोधासाठी पाम्यात सोनार व्बॉय पाठवण्यात आलेय. त्याशिवाय जहाजांचीही मदत घेतली जात आहे.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी दोन कोटींचा खर्च -
कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष आहेत. ते पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. टायटॅनिकचे अवशेष 3800 मीटर खोलवर आहेत. हे पर्यटन साधारण 8 दिवसांचं आहे. या 8 दिवसाच्या पर्यटन यात्रेचं तिकीट तब्बल अडीच लाख डॉलर म्हणजे 2 कोटी रुपये इतकं आहे.. ही यात्रा सेंट जोन्सच्या न्यूफाउंडलँडपासून सुरु होते. टायटॅनिक जहाज 1912 मध्ये समुद्रात बुडालं होते. हिमनगाला आदळल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले अन् समुद्रात बुडाले होते. त्या दुर्घटनेत 1500 जणांचा मृत्यू झाला. टायटॅनिक जहाजाचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते.
आणखी वाचा :
Titanic Sink :टायटॅनिक बुडणार हे आधीच लिहिलं गेलं होतं, लिहिणारा मात्र विधाता नव्हता...!!