अमेरिका हिंसाचार: ट्रम्प यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिश्चित काळासाठी बंदी, मार्क झुकरबर्ग यांची माहिती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली गेली आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी पॉलिसीच्या उल्लंघनामुळे फेसबुकने राष्ट्रपतींच्या खात्यावर 24 तास बंदी घातली होती. ट्विटरनेही ट्रम्प यांच्या हँडलवर 12 तास बंदी घातली होती.
ट्रम्प यांच्या समर्थकांनी शांततेत सत्ता हस्तांतरण रोखण्यासाठी कॅपिटल बिल्डिंगवर (यूएस संसद भवन) हल्ला केला आणि त्यादरम्यान अभूतपूर्व हिंसाचार आणि अराजक माजले. बुधवारी कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी पोलिस अधिकाऱ्याच्या गोळीने एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला आणि दोन पुरुष कॅपिटल मैदानाजवळ आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू पावले.
धक्कादायक! US Capitol मधील अभुतपूर्व गोंधळावर जागतिक राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी
याप्रकरणी असंख्य आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. महानगर पोलिस विभागाचे प्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारास लाजिरवाणे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अनेक नेत्यांनी या हिंसाचाराची टीका केली आहे.
US Capitol | ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेत संसदेत धुडगूस; हा देशद्रोह, बायडन यांची प्रतिक्रिया
हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “निवडणुकीच्या निकालाशी मी पूर्णपणे सहमत नाही आणि या मतावर मी ठाम आहे. तरीही 20 जानेवारीला पद्धतशीरपणे सत्ता हस्तांतरण होईल,” अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या या लढाईची ही सुरुवात आहे, असेही ते म्हणाले.