एक्स्प्लोर

US Capitol | ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेत संसदेत धुडगूस; हा देशद्रोह, बायडन यांची प्रतिक्रिया

US Capitol Under Siege : डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.

तर दुसरीकडे निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी.

कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं जो बायडन म्हणाले. "मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न पाळणाऱ्यांचीही संख्या आहे, असं बायडन म्हणाले.

हिंसेत महिलेचा मृत्यू, अनेक जखमी कॅपिटल बिल्डिंगबाहेर ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचं समजतं. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. यूएस कॅपिटलमध्ये एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला तर हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.

ट्रम्प यांचं समर्थकांना शांततेचं आवाहन दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. शांततेत आंदोलन करण्याचा आवाहन करताना ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आपण कायदा-सुव्यवस्थेचा पक्ष आहोत.

फेसबुकने ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला ट्विटरपाठोपाठ फेसबुकनेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. यूएस कॅपिटलमध्ये हिंसेदरम्यान ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केलं होतं. फेसबुकचे अधिकारी गाय रोसेन म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. कारण त्यांचा व्हिडीओमुळे यूएस कॅपिटलमधील हिंसेंला प्रोत्साहन देते असं आमचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget