(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताशी पंगा घेणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांची अवस्था वाईट, राष्ट्रपतींची खुर्चीही धोक्यात, नेमकं कारण काय?
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : भारत (India) आणि मालदीवमध्ये (Maldives) सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohammad Moijju) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. मालदीवमधील स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाचा मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत आहे. Sun.MV शी बोलताना MDP खासदार म्हणाले, “आम्ही महाभियोग प्रस्तावावर ठराविक स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. तो लवकरच संसदेत सादर केला जाईल.
रविवार 28 जानेवारी रोजी मंत्रिमंडळात मतदान करण्यापूर्वी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील चार सदस्यांची संसदीय मान्यता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच यासंदर्भातली माहिती समोर आलीये. या निर्णयामुळे सरकारमधील खासदारांनी विरोध सुरु केला. त्यामुळे संसदीय बैठकीचे कामकाज विस्कळीत करण्यात आले.
खासदारांमध्ये हाणामारी
मंत्रिमंडळात चार सदस्यांना मान्यता देण्यावरुन मतभेद झाले. त्यामुळे सरकारमधील खासदार आणि विरोधी खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. हाणामारीदरम्यान, कंदिथिमुचे खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम शाहीम आणि केंदिकुलहुडूचे खासदार अहमद इसा यांच्यात हाणामारी झाली. हाणामारीत दोन्ही खासदार चेंबरजवळ पडले, त्यामुळे शाहीम यांच्या डोक्यालाही दुखापत झाली.
ކެނދިކުޅުދޫ ދާއިރާގެ މެމްބަރު އީސާގެ ފައިގައި ހިފައި ކަނޑިތީމު މެމްބަރު ޝަހީމް ވައްޓާލާ މަންޒަރު. އެމްޑީޕީ ދޫކޮށް ޕީއެންސީއާ ގުޅުނު ސަރުކާރުގެ މެމްބަރުން މަޖިލީހަށް ހުރަސް އެޅުމާއެކު ތަޅުމުގައި ހަމަނުޖެހުން އަންނަނީ ހިނގަމުން. pic.twitter.com/mnmzvYKsrO
— Adhadhu (@AdhadhuMV) January 28, 2024
भारत मालदीव वादाची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी टीप्पणी केली आणि भारत आणि मालदीव या वादाने जन्म घेतला. दरम्यान या वादामुळे अनेक भारतीयांनी त्यांचा मालदीवची ट्रीप रद्द करुन लक्षद्वीपला जाणं पसंत केलं. यामुळे मालदीवच्या पर्यटनावर बराच परिणाम झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच मालदीवच्या राष्ट्रपतींनी चीनचा दौरा केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातच आता मालदीवच्या राष्ट्रपतींची अवस्था सध्या वाईट असल्याचं पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा :