(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Maldives Relations : 'भारतासोबत आमची जुनी मैत्री...' मालदीवचे राष्ट्रापती मोईज्जू यांचे बदलले सूर
India Maldives Relations : मालदीवच्या राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांनी भारताच्या राष्ट्रपती दौपद्री मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
मुंबई : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लक्षद्वीपचे (Lakshdweep) फोटो शेअर केले त्यानंतर भारत आणि मालदीवमधील (Maldives) संबंधांमध्ये काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. पण या तणावादरम्यान राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांनी दोन्ही देशातील संबंधाविषयी कौतुक केले आहे. मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात राष्ट्रपती मोईज्जू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आणि परस्पर आदर यावर भर दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात मालदीवच्या जनतेच्या आणि सरकारच्या वतीने भारताच्या जनतेचे आणि सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी मालदीव आणि भारताची मैत्री शतकानुशतके जुनी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं. मागील काही दिवसांपासून मालदीव आणि भारत हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचं पाहायाल मिळालं.
वादाची सुरुवात कशी झाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी टीप्पणी केली आणि भारत आणि मालदीव या वादाने जन्म घेतला. दरम्यान या वादामुळे अनेक भारतीयांनी त्यांचा मालदीवची ट्रीप रद्द करुन लक्षद्वीपला जाणं पसंत केलं. यामुळे मालदीवच्या पर्यटनावर बराच परिणाम झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच मालदीवच्या राष्ट्रपतींना चीनचा दौरा केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मालदीवच्या पर्यटनावर परिणाम
मालदीवमध्ये 180 हॉटेल्स आहेत, ज्यासाठी भारत ही मुख्य बाजारपेठ आहे. येत्या काही महिन्यांत मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मालदीवचे आतापर्यंत 25-50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 400 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे. याचा परिणाम तिथल्या हॉटेल व्यावसायिकांवर होणार असल्याचं चित्र आहे.
भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये कटुता
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केली. या सगळ्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये बराच तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप देखील रद्द केली. त्यामुळे मालदीवला आर्थिकदृष्ट्या बराच फटका बसला. दरम्यान या सगळ्यामध्ये मालदीव आणि चीनचे देखील संबंध वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवच्या संबंधावर चर्चा सुरु झाली.
हेही वाचा :