India-Maldives Row : चीनला जाऊन येताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला ललकारले; म्हणाले, 'आम्ही लहान, पण..' चीनला सुद्धा केली विनंती
India Maldives Row : पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता.
![India-Maldives Row : चीनला जाऊन येताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला ललकारले; म्हणाले, 'आम्ही लहान, पण..' चीनला सुद्धा केली विनंती Maldives president Mohamed Muizzu took an indirect jibe at India over India Maldives Row following his five day visit to China India-Maldives Row : चीनला जाऊन येताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला ललकारले; म्हणाले, 'आम्ही लहान, पण..' चीनला सुद्धा केली विनंती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/897c3f860ea7d6ea9b33c5d6b11fa0681705160183915736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India-Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये (India-Maldives Row) तणाव कायम आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताची खरडपट्टी काढली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू त्यांचा 5 दिवसांचा चीन दौरा संपवून मालदीवला परतले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही लहान असू पण आम्हाला धमकावण्याचा परवाना त्यांना (भारत) दिलेला नाही.
मंत्र्यांकडून पीएम मोदींवर अपमानास्पद टिप्पणी
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध तणावपूर्ण आहेत. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी मालदीव सरकारने गेल्या 7 जानेवारीला आपल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबितही केले होते.
Maldives President Muizzu in a presser after arriving from China State Visit:
— Sidhant Sibal (@sidhant) January 13, 2024
"We may be small, but that doesn’t give you the license to bully us"
Comments without taking the name of any country pic.twitter.com/cU0uWSa5mt
भारतासोबतच्या राजनैतिक वादाच्या दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी गुरुवारी (11 जानेवारी) बीजिंगमध्ये त्यांच्या पहिल्या चीन भेटीदरम्यान मालदीवच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करेल आणि बेट राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य राखण्यास पाठिंबा देत आहोत.
मालदीव आणि चीनचे संयुक्त निवेदन
मुइझू यांची चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, 'दोन्ही बाजू त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत आहेत.'
चीनमधून अधिकाधिक पर्यटक पाठवण्याचे मोहम्मद मुइज्जूंचे आवाहन
मालदीवने चीनला बेट राष्ट्रात अधिक पर्यटक पाठवण्याच्या 'वेगवान' प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी बुधवारी (10 जानेवारी) त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)