स्पेन आणि पोर्तुगालमध्ये 'ब्लॅकआऊट', वीज पुरवठा खंडित झाल्याने देशभर काळोख, इंटरनेट बंद अन् विमानासह सर्वच सेवा ठप्प
वीज पुरवठा ठप्प झाल्याने युरोपमधील काही देशांच्या विमानसेवेसह सर्व यातायात ठप्प झाल्याचं दिसतंय. या मागचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलं नाही.

मुंबई : युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमध्ये राजधानींसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित (Massive power outage in Spain and Portugal) झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या देशांतील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. परिणामी विमानसेवा आणि भूयारी मार्गही बंद पडले आहेत. या दोन देशांतील संपूर्ण यातायात सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अनागोंदी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही दोन देशांची एकत्रित लोकसंख्या ही पाच कोटींहून अधिक आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला याचा फटका बसला आहे. हा वीजपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे खंडीत झाला याची मात्र अद्याप माहिती नाही.
⚡ MASSIVE BLACKOUT IN EUROPE
— NEXTA (@nexta_tv) April 28, 2025
Residents in Spain, Portugal, France, and Belgium report major outages.
Airports and subways shut down, communication networks hit.
Madrid's Barajas Airport is out of service, El Mundo reports.
No official cause confirmed yet. Chaos unfolds. pic.twitter.com/vZyJOjhEwj
स्पेनला वीज पुरवठा करणारी कंपनी रेड इलेक्ट्रिकाने एका निवेदनात म्हटलं आहे की, संपूर्ण देशातील वीज पुरवठा पूर्वव्रत करण्यासाठी वीज कंपन्यांसोबत युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
ब्लॅकआऊटमुळे सर्व ठप्प
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट झाल्यामुळे मेट्रोसह सर्वच सेवा ठप्प आहेत. अनेक रुग्णालयात बॅकअप जनरेटरच्या सहाय्याने सेवा देण्यात येत आहेत. तर मेट्रोच्या भूयारात संपूर्ण काळोख पसरल्याचं चित्र आहे.
सायबर हल्ल्याची शक्यता
स्पेन आणि युरोपमध्ये झालेल्या या ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ला कारणीभूत असण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने आता तपास केला जात आहे.
🔴 BREAKING: 🇪🇸 Red Electrica, the electricity grid operator in Spain, is working with energy companies to bring electricity back. The Spanish National Cyber Security Institute (INCIBE) is investigating whether the outage is linked to a possible cyber attack. The reason for the… pic.twitter.com/r0tQomtZPL
— Daily Finance (@DailyFinanc) April 28, 2025
लोकांनी संयम बाळगावा
दरम्यान, ब्लॅकआऊट झाल्याने अनेक ठिकाणी लोकांचा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे कांनी कोणताही गोंधळ न घातला संयम बाळगावा असं आवाहन आता दोन्ही देशांच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:
























