एक्स्प्लोर
जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : पंतप्रधान मोदी
जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय इस्रायलच्या दौऱ्याचा आजचा (दि. 5 जुलै) दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांना आज इस्रायलमधील भारतीय समुदायालाा संबोधित केलं. 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्रायल दौरा करत असून, एका जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना आपल्या मनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, इस्रायमध्ये मराठी भाषेत 'मायबोली' नावाचं मासिक प्रकाशित होतं, याबद्दल आनंदही व्यक्त केला.
आपल्या सरकारची रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रांसफॉर्म ही त्रिसूत्री आहे. जीएसटी लागू झाल्याने देशाच्या अर्थकारणाला एकसूत्रात बांधण्यात आलंय याचाही उल्लेख मोदींनी केला.
आपल्या कार्यकाळात नियमावलीत सुसूत्रता आणल्याचं सांगून मोदी पुढं म्हणाले की, ''विद्यमान सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुतंवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लहानसहान गोष्टींसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. तसेच जर एखाद्या तरुणाला स्टार्टअप सुरु करायचं असेल, तर तो एका दिवसात नोंदणी करुन आपला उद्योग सुरु करु शकतो,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रत्येक भारतीयला घर देण्याबद्दल सांगिताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''2022 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठी 2022 पर्यंत आम्ही भारतातील सर्व गरीबांना घरं देणार आहेत. त्यासोबतच वीज आणि पाणी यासारख्या सुविधाही उपलब्ध करुन देण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.''
LIVE UPDATE
LIVE : 70 वर्षात पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानाचा इस्रायल दौरा, जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना : मोदी
LIVE : नेतान्याहू यांनी जो सन्मान दिला, तो 125 कोटी भारतीयांचा, हा सन्मान कधीही विसरणार नाही : मोदी
LIVE : नेतान्याहू यांना भारतीय अन्नपदार्थांविषयी प्रेम : मोदी
LIVE : भारत आणि इस्रायलच्या सणउत्सवांमध्येही साम्य : मोदी
LIVE : कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या आकारावर नव्हे, देशातील नागरिकांच्या विश्वासावर अवलंबून : मोदी
LIVE : इस्रायलमध्ये मराठी भाषेतील मायबोलीचं सतत प्रकाशन केलं जातं : मोदी
LIVE : इस्रायलने त्यांच्या कौशल्याने मोठ्या-मोठ्या देशांना मागे टाकलं : मोदी
LIVE : 2022 ला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत भारतातील प्रत्येक गरीबाला हक्काचं घर देणार : मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
राजकारण
क्राईम
Advertisement